virat-kohli-rohit-sharma saam tv news
Sports

IND vs SA: विराट-रोहितला टी-२० अन् वनडे संघातून बाहेर का ठेवलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

Virat Kohli- Rohit Sharma: बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित आणि विराटला टी-२०, वनडे संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. काय आहे यामागचं कारण?

Ankush Dhavre

India vs South Africa, Team India Squad:

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा होण्यापूर्वी माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसून येतील, मात्र असं काहीच झालं नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना कसोटी संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र या दोघांनाही वनडे आणि टी-२० संघात स्थान देण्यात आलेलं नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच बीसीसीआयने रोहित आणि विराटला संघाबाहेर ठेवण्याचं कारण सांगितलं आहे. प्रेस रिलीजमध्ये बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, विराट आणि रोहितला मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती हवी होती.

त्यांच्या विनंतीला मान देत बीसीसीआयने दोघांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही फलंदाज थेट कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहेत. या दौऱ्यावर रोहित शर्माकडे कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर केएल राहुलकडे वनडे आणि सूर्यकुमार यादवकडे टी-२० संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Latest sports updates)

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित राहणार कर्णधार?

भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष आता टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर असणार आहे. या स्पर्धेतही रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे, असं अनेक वृत्तांमध्ये म्हटलं गेलं आहे. तर अनुभवी खेळाडू म्हणून विराट कोहलीला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाणार आहे.

भारत- दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर जानेवारी महिन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित कमबॅक करताना दिसून येऊ शकतात. ही टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी शेवटची टी-२० मालिका असणार आहे. त्यानंतर आयपीएल २०२४ स्पर्धेला प्रारंभ होईल. आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार उघडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : कुण्या गावाचं आलं पाखरू; सोनालीच्या सौंदर्याने केलाय कहर, पाहा PHOTOS

भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्याचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Parbhani: ३ भावांची आदर्श वाटणी! २ शिक्षक भावांनी तिसर्‍याला सर्वकाही दिले, वडिलांच्याही डोळ्यात पाणी

Mira Bhayandar: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिका, मुस्लिम बांधवाचा सल्ला|VIDEO

Nagpur: कुत्र्याला पाहून घाबरला, पळताना ५ व्या मजल्यावरून पडला; १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT