IND vs AUS, Weather Report: भारत- ऑस्ट्रेलिया टी-२० सामना पावसामुळे वाहून जाणार का? पावसाबाबत समोर आली मोठी अपडेट

India vs Australia 4th T20I Weather Update: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आज (१ डिसेंबर) चौथ्या टी -२० सामन्याचा थरार पार पडणार आहे. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
cricket-ground
cricket-ground saam tv news
Published On

IND vs AUS 4th T20 Weather Updates:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आज (१ डिसेंबर) चौथ्या टी -२० सामन्याचा थरार पार पडणार आहे. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

मालिकेतील सुरवातीचे २ सामने जिंकून भारतीय संघ या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मालिकेत दमदार कमबॅक केलं. भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला मालिका बरोबर करण्याची संधी असणार आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे धुतला जाणार का? वाचा कसं असेल हवामान.

कसं असेल हवामान?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा चौथा टी -२० सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. इथल्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर, weather.com च्या अंदाजानुसार पूर्ण दिवस आभाळ मोकळं असेल. (India vs Australia Weather Update)

सरासरी तापमान हे २० ते २४ अंश सेल्सिअसच्या मध्ये असेल. संध्याकाळी ५ च्या दरम्यान ढगाळ वातावरण होऊ शकतं. त्यांनतर मात्र आभाळ मोकळं असेल. (Latest sports updates)

cricket-ground
IND vs AUS, Playing 11: चौथ्या टी-२० साठी टीम इंडियात होणार बदल! या २ धाकड खेळाडूंना मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा सामना...

या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने लागोपाठ विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने धावांचा पाठलाग करत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात धावांचा बचाव करताना विजय मिळवला.

या विजयासह भारतीय संघाने मालिकेत २-० ची आघाडी घेतली. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक केलं आणि भारतीय संघाचा पराभव केला. आज होणारा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे ही मालिका २-२ ने बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे.

cricket-ground
Ishan Kishan Mistake: एक चूक आणि टीम इंडियाचा पराभव; इशानची अतिघाई टीम इंडियाला महागात पडली

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com