Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला 'महाराष्ट्राची अप्सरा' म्हणून ओळखतात.
सोनाली कुलकर्णीने सुंदर पारंपरिक लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सोनालीने आकाशी आणि गोल्डन रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूपच क्युट दिसत आहे.
सोनालीच्या पैठणी ड्रेसवरील नक्षीकामाने लक्ष वेधून घेतले आहे.
कानात झुमके, हातात बांगड्या, मोकळे केस आणि मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
युरोपीयन मराठी संमेलनसाठी सोनालीने हा खास लूक केला आहे.
"मन साडीत, पैठणीत, पोलक्या परकरात… " असे हटके कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे.
सोनालीचा हा मराठमोळा साज पाहून चाहत्यांनी कमेंट्स बॉक्स भरला आहे.