Parbhani
ParbhaniSaam Tv

Parbhani: ३ भावांची आदर्श वाटणी! २ शिक्षक भावांनी तिसर्‍याला सर्वकाही दिले, वडिलांच्याही डोळ्यात पाणी

Parbhani News: परभणीच्या दहिफळे कुटुंबाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तीन भावंडांनी न भांडता शेतजमिनीची वाटणी केली आहे. तिघांनी एकमेकांना समजून घेतले आहे.
Published on

आज भावांमध्ये जमिनिच्या एक एक इंचावरून भाऊ भावाचा जीव घेण्याचे,कोर्ट कचेऱ्या करून आयुष्यभर एक मेकांचे तोंडही बघितले जात नसल्याचे अनेक उदाहरण आज आहे मात्र यातच काही बोटावर मोजण्या इतके असेही कुटुंब आहेत कि जे जमिनी पेक्षा नात्याला मानतात.परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी शेतवाटणी असाच एक आदर्श घालून दिलाय.

Parbhani
Success Tips : आयुष्यात यश मिळवण्याचे हे नियम तुम्हाला माहितीयेत का?

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथराव दहिफळे यांच्या कुटुंबाने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे..त्यांना ३ मुले आणि १ मुलगी आणि नातवंड असा मोठा परिवार आहे..मोठा मुलगा प्रा डॉ बाळासाहेब व लहान मुलगा प्रा युवराज हे दोघे हि प्राध्यापक आहेत आणि मधवा मुलगा केशव हे शेती करतात.

वडिलांची एकूण साडे सोळा एकर जमीन,गावात घर,जागा असा प्रपंच यात ९१ व्या वर्षी त्यांनी माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वाटण्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर तिन्ही भाऊ त्यांच्या पत्नी,बहीण असे सर्वानी घरच्या घरीच बसून वाटण्या केल्या ज्यात दोन्ही प्राध्यपक भावांनी स्वतःला नोकरी असल्याने शेतीत राहणाऱ्या भावाला एकून १६.५ एकर जमिनी पैकी ९.५ एकर जमीन देत स्वतः ३-३ एकर जमीन ठेवलीय एवढेच नाही तर शेती करणाऱ्या भावाच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारही घेतलीय. कुठलाही वाद विवाद न घालता अतिशय आनंदात हे सर्व घडले ते हि त्यांच्या आई वडिलांसमोर.

Parbhani
Success Story: डॅशिंग IPS ऑफिसर अंजली विश्वकर्मा! ४८ लाखांची नोकरी सोडली, दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

सध्याच्या वातावरणात एकत्रित कुटुंब पद्धती खुप कमी पाहायला मिळते. त्यात दहिफळे कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धती तर जपली. याशिवाय नात्यातील गोडवा हि कायम ठेवला आहे. एवढा मोठा निर्णय घेताना घरातील महिलांचे विचार जुळणे हे अत्यंत महत्वाचे असते दहिफळे कुटुंबियातील महिलांनीही या निर्णयाला हसत हसत पाठींबा दिला आमच्या कुटुंबात आम्ही बहिणीसारखे राहतो आणि जे काही निर्णय घ्यायचे ते सर्व जण मिळून घेतो असे तिन्ही जावा सांगतात.

साडे सोळा एकर मधील जी ९.५ एकर जमीन मधवा भाऊ केशव दहिफळे यांच्या वाटणीला आलीय ती जमीन पूर्णतः पाण्याखाली असुन २ विहीर बोअर शेतात आहे शिवाय साडे नऊ एकरमधली आंबराई ही त्यांच्या हक्कात आली आहे. तसेच मुलगा आणि मुलीचे शिक्षण आणि लग्न हि नोकरदार भाऊच करणार असल्याने केशव आणि त्यांच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झालाय..

Parbhani
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

दरम्यान गंगाखेडच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या खादगावात विना वाद विना भांडणे केवळ वडिलांनी सांगणे आणि भावांनी ऐकून संपत्तीची वाटणी केली केवळ वाटणीच नाही तर जो भाऊ आर्थिक कमजोर आहे त्याला यातून उभे केले याची चर्चा महाराष्ट्र चालू आहे.

Parbhani
Success Story: IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; इंजिनियरिंग केल्यानंतर क्रॅक केली UPSC; अनुपमा अंजली यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com