रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा संघ गुलाबी रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरला होता. यामागे खास कारण आहे. राजस्थानच्या खेळाडूंनी गुलाबी रंगाची जर्सी घालून एक खास मेसेज देण्याचा प्रयत्न केला. जयपुरला पिंक सिटी म्हणून ओळखला जातो. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. दरम्यान यामागचं कारण काय? जाणून घ्या.
राजस्थानमधील महिला सशक्तिकरणाला चालना देण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू गुलाबी रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरले होते. राजस्थानातील ग्रामीण भागातील महिलांना सपोर्ट म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. यासह समाजात परिवर्तन घडवून आणणं यामागचा प्रमुख उद्देश होता.
'जर स्त्री असेल तर भारत आहे' हे राजस्थान रॉयल्स फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राजस्थान रॉयल्स संघाच्या तिकिट विक्रितून आणि जर्सीमधून जी कमाई होते ती या फाऊंडेशनला देणगी म्हणून दिली जाते. या फाऊंडेशनद्वारे खास मेसेज देण्यात आला आहे. महिला पुढे गेली, तर भारत आपोआप पुढे' जाईल. असा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न या फाऊंडेशनद्वारे केला जातोय. यासह राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यातील प्रत्येक षटकारावर राजस्थानातील ग्रामीण भागातील घरांमध्ये एक सोलार पॅनेल बसवण्यात आला आहे. (Cricket news in marathi)
या सामन्यासाठी अशी होती दोन्ही संघांची प्लेइंग ११:
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangluru): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक) सौरव चौहान, रिस टोप्ली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.