rahul dravid with rohit sharma twitter
Sports

Rahul Dravid Head Coach: राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज का केला नाही? समोर आलं मोठं कारण

Rahul Dravid News In Marathi: राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती.

Ankush Dhavre

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी रवी शास्त्रींनंतर २०२१ मध्ये ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपर्यंत होता. मात्र त्यांना टी -२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत थांबवण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज करण्यासाठी नकार का दिला? यामागचं एक मोठं कारण समोर आलं आहे. (Rahul Dravid News )

बीसीसीआयच्या नियमानुसार, ज्या कोणाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनायचं असेल त्याला अर्ज दाखल करणं अतिशय महत्वाचं आहे. राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र त्यांना ही अर्ज दाखल करणं बंधनकारक होतं. त्यांनी या पदासाठी पुन्हा एकदा अर्ज केलाच नाही. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

जय शहांनी सांगितलं कारण

राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपद का सोडलं? याचं कारण आता समोर आलं आहे. जय शहा म्हणाले की, त्यांनी मला सांगितलं होतं की, 'कौटुंबिक कारणास्तव ते पुन्हा या पदासाठी अर्ज दाखल करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी हे पदा सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर केला आणि त्यांना फोर्सही केलं नाही. '

राहुल द्रविड यांचा यशस्वी कार्यकाळ

राहुल द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील जमेची बाजू म्हणजे, या काळात खेळाडूंमध्ये वाद आणि फूट पडण्याच्या घटना घडल्या नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय खेळाडूंमध्ये शिस्त पाहायला मिळाली. यासह भारताने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेची सेमिफायनल गाठली. यासह २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि आता टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

SCROLL FOR NEXT