Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? जय शहांचा मोठा खुलासा

Jay Shah On Team India Captaincy: भारतीय संघाच्या वर्ल्डकप विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? जय शहांचा मोठा खुलासा
rohit sharma with jay shahtwitter
Published On

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत जेतेपदावर नाव कोरलं. फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पहिलीच ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रोहितनंतर कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार? याबाबत जय शहा यांनी संकेत दिले आहेत.

कोण होणार भारतीय संघाचा पुढील कर्णधार?

भारतीय संघाने १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत टी -२० वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. आता पुढील वर्ल्डकप २०२६ मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची संघबांधणी व्हावी म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्त होक्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची खुर्ची रिकामी झाली आहे.

Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? जय शहांचा मोठा खुलासा
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

याबाबत बोलताना जय शहा म्हणाले की, ' कर्णधार कोण होणार याचा निर्णय निवडकर्ते घेतील. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर काय तो निर्णय घेऊ. हार्दिक पंड्याच्या फॉर्मबाबत असंख्य प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र आम्ही आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि स्वतःला सिद्ध केलं आहे.' जय शहा यांच्या या वक्तव्यावरून तरी हेच वाटत आहे की, भारतीय संघाचा पुढील कर्णधार हार्दिक पंड्या होऊ शकतो. मात्र त्यांनी उघडपणे काहीच जाहीर केलेलं नाही.

Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? जय शहांचा मोठा खुलासा
Hardik Pandya Record: पहिल्याच सामन्यात हार्दिक रचणार इतिहास! २ विकेट्स घेताच ५ गोलंदाजांना सोडणार मागे

हार्दिक पंड्याला नेतृत्वाचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्स पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली होती. तर त्यानंतर पुढील हंगामात त्याने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. यासह रोहितच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com