kl rahul twitter
Sports

KL Rahul: रोहितने केएल राहुलला Playing XI मधून बाहेर का ठेवलं? समोर आलं मोठं कारण

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून केएल राहुलला वगळण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

Team India Playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय न्यूझीलंडच्या बाजूने लागला.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल केले आहेत. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे.

या मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात शुभमन गिलला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी सरफराज खानला संधी दिली गेली होती.

या संधीचा फायदा घेत त्याने दुसऱ्या डावात १५० धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे गिल संघात परतल्यानंतर बाहेर कोण जाणार? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. काहींचं म्हणणं होतं की, केएल राहुलला बाहेर केलं पाहिजे. मात्र सामन्याच्या एक दिवसाआधी गंभीर म्हणाला होता की, आम्ही राहुलचा बचाव करणार. त्यामुळे केएल राहुल प्लेइंग ११ मध्ये खेळणार अशी चिन्ह होती.

मात्र प्लेइंग ११ ची घोषणा झाली, तेव्हा केएल राहुलला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरफराज खानला प्लेइंग ११ मध्ये कायम ठेवण्यात आलं आहे. त्याने गेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

तर दुसरीकडे केएल राहुल दोन्ही डावात फ्लॉप ठरला होता. त्यामुळेच गिल परतल्यानंतर केएल राहुलला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुलसह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादजला देखील प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

SCROLL FOR NEXT