CSK captaincy Dhoni saam tv
Sports

MS Dhoni CSK: पुन्हा पुन्हा धोनीच का? CSK मध्ये असा एकही खेळाडू नाही जो कॅप्टन्सी सांभाळेल? मॅनेंजमेंटचं नेमकं कुठे चुकतंय पाहा

CSK captaincy Dhoni : गुरुवारी संध्याकाळी एक मोठी घडामोड घडली. सीएसकेने जाहीर केलं की ऋतुराज गायकवाडला झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित आयपीएल सामन्यांमधून बाहेर पडतोय. त्याचवेळी संघाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आणि पुन्हा एकदा एमएस धोनीकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२४ च्या आयपीएलमध्ये सर्व टीमच्या कर्णधाराचं फोटोशूट होतं तेव्हा CSK च्या कर्णधाराला पाहून सर्वांना मोठा धक्का बसला होता. याचं कारण म्हणजे फोटो सेशनसाठी सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड उपस्थित होता. २०२४ पासून सीएसकेच्या टीमची कमान धोनीला सोडून ऋतुराजकडे सोपवली होती.

ऋतुराजकडे कॅप्टन्सी दिल्यानंतर असं मानलं जात होतं की, फ्रँचायझीने पुढचा विचार करण्यात सुरुवात केलीये. पण गुरुवारी संध्याकाळी यामध्ये एक ट्विस्ट आला. सीएसकेने अचानक घोषणा केली की, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर आहे. यासोबतच नवीन कर्णधाराचं नाव म्हणून एमएस धोनीकडे कमान सोपवण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी, सीएसकेने पुढचा विचार केला होता तर पुन्हा धोनीला कमान का दिली असा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.

अनेक टीम्सने बदलला कर्णधार?

आयपीएल २०२५ च्या सिझनेमध्ये अनेक टीम्सने नवीन कर्णधारांची निवड केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सिझन सुरू होण्यापूर्वी पुन्हा कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र पण आरसीबीने तरुण खेळाडू रजत पाटीदारकडे कर्णधारपद सोपवलं. त्याचप्रमाणे, मुंबई इंडियन्सने गेल्या सिझनमध्ये रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं होतं.

चेन्नईकडे तरूण खेळाडू नाही?

चेन्नई सुपर किंग्जने धोनी सोडून दुसऱ्या नेतृत्वाला विकसित होऊ दिलं नाही. सुरेश रैनाला बराच काळ भविष्यातील कर्णधार मानलं जातं होतं. परंतु टीमने त्याला कायम रिटेन केलं नाही. त्याचप्रमाणे फाफ डू प्लेसिसकडे कर्णधारपद सांभाळण्याची क्षमता होती, परंतु सीएसकेनेही त्यामध्ये फारसा रस दाखवला नाही.

२०२२ मध्ये रवींद्र जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आलं. मात्र तो चांगली छाप पाडू शकला नाही. त्यावेळी सिझनच्या मध्यातच पुन्हा एकदा कर्णधारपद धोनीला सोपवण्यात आलं. मात्र धोनीला पुन्हा कॅप्टन्सी देऊन टीम फारशी चांगली कामगिरी करू शकलेली नाही.

मुख्य म्हणजे टॉस आणि सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये, मैदानावर कधीही असं वाटलं नाही की धोनी कर्णधारपद भूषवत नाही. ऋतुराज गायकवाड यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती दिसून आली. सर्व निर्णयांमध्ये धोनीचा प्रभाव दिसून येत होता. आता ऋतुराजची दुखापत किती गंभीर आहे हे तोच सांगू शकतो. पण कर्णधारपदाच्या मार्गावर पुढे जाण्याऐवजी त्याला मागे हटवल्याने सीएसकेचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT