Rishabh Pant: 5 सामन्यात फक्त 19 रन्स, कोट्यवधी घेणारा ऋषभ पंत खराब फॉर्मवर म्हणाला, माझ्या हातावर....!

Rishabh Pant poor form 2025: २७ कोटींचा मोठा करार असूनही ऋषभ पंतने या हंगामात अजूनही २७ धावांचा आकडा पार केलेला नाही. पाच सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे त्याच्यावर चौफेर टीका केली जात आहे.
Rishabh Pant poor form
Rishabh Pant poor formsaam tv
Published On

यावर्षी आयपीएलपूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतला २७ कोटी रूपये मोजून लखनऊ सुपर डाएट्सने आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र अजूनही पंतची बॅट काही फारशी चांगली कामगिरी करू शकलेली नाही. लखनऊने या सिझनमध्ये आतापर्यंत ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या खराब फॉर्मबाबत पंतने मोठं विधान केलं आहे.

27 कोटी रूपये मोजून अजून पंतला या सिझनमध्ये २७ रन्सही करता आलेले नाहीत. पंतचा पाच सामन्यांमधील फ्लॉप शो पाहता त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात येतेय. सोशल मीडियावर ऋषभला ट्रोल देखील करण्यात येतंय. अशातच आपली बॅट का शांत आहे यावर अखेर पंतने मौन सोडलं आहे.

Rishabh Pant poor form
Mumbai Indians: चार पराभवानंतर MI ला प्लेऑफ गाठणं शक्य? कसं आहे Points Table चं समीकरण?

काय म्हणाला ऋषभ पंत?

ऋषभ पंतला आयपीएल २०२५ च्या सिझनमधील पाच सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त १९ रन्स करता आलेत . ज्यामध्ये त्याने सर्वाधिक १५ रन्स केले आहेत. याशिवाय तो एकदा शून्यावर देखील बाद झाला आहे. त्याच्या खराब फॉर्मबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ऋषभ पंत म्हणाला, माझ्या हातावर फोड आलेत.

पंतच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी मी प्रॅक्टिस करतो तेव्हा मी स्वतःसाठी प्रॅक्टिस करतो. आता इतकी प्रॅक्टिस केली आहे की, माझ्या हातावर फोड आले आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस करणं काही चिंतेची बाब नाही. ज्यावेळी मी माझ्या सर्व गोष्टी संपवतो तेव्हा मी टीम डिस्कशनमध्ये सहभागी होतो.

Rishabh Pant poor form
Riyan Parag: OUT की NOT OUT...! बाद झाल्यानंतर थेट अंपायरशी भिडला रियान पराग, अहमदाबादच्या मैदानात मोठा ड्रामा

गेल्या आयपीएल सिझनपर्यंत ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. पण त्याने स्वतःला ऑक्शनमध्ये काढलं. लखनऊ टीमने त्याला २७ कोटी रुपयांना त्यांच्या टीममध्ये समाविष्ट केलं आणि त्याला कर्णधार बनवलं. ज्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. परंतु या सिझनमध्ये त्याच्या बॅटने आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com