RCB vs DC: हे माझं ग्राऊंड आहे...! आरसीबीविरूद्ध विजय मिळवल्यानंतर असं का म्हणाला केएल राहुल?

IPL 2025 RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष गाठण्यासाठी फलंदाजीला सुरुवात केली, पण त्यांची इनिंग फारशी ठोस राहिली नाही. केवळ ५८ धावांमध्ये त्यांचे ४ प्रमुख फलंदाज माघारी परतले होते.
IPL 2025 RCB vs DC
IPL 2025 RCB vs DCsaam tv
Published On

गुरुवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बंगळूरूचा दारूण पराभव केला. केएल राहुलच्या नाबाद ९३ रन्सच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला. इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 24 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 6 विकेट्स राखून पराभव केला.

दरम्यान या विजयानंतर केएल राहुलने सांगितलं की, विकेट अवघड होती, पण २० ओव्हर विकेटकीपिंग केल्याने त्याला फलंदाजी करण्यास मदत झाली. या सामन्यात १६४ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने ५८ रन्समध्ये चार विकेट्स गमावले. मात्र त्यानंतर राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी उत्तम कामगिरी करत टीमला विजय मिळवून दिला.

सामन्यानंतर काय म्हणाला राहुल?

सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला की, "ही विकेट अवघड होती, परंतु 20 ओव्हर विकेटकिपींग करून मला ते समजण्यास मदत झाली. कोणते शॉट्स खेळायचे हे मला माहित होतं आणि मला चांगली सुरुवात करायची होती. अशा विकेटवर कुठं खेळायचं हे मला माहित होतं.

IPL 2025 RCB vs DC
Rishabh Pant: 5 सामन्यात फक्त 19 रन्स, कोट्यवधी घेणारा ऋषभ पंत खराब फॉर्मवर म्हणाला, माझ्या हातावर....!

सिक्स मारायची असेल तर ती कुठे मारायची? विकेटकिपींगमुळे मला फलंदाज कुठे बाद होत आहेत आणि कुठे सिक्स मारतायत हे कळत होतं. नशिबानेही मला साथ दिली की मी कॅच देखील सुटला, असंही केएल राहुल म्हणाला.

राहुल पुढे म्हणाला की, "हे माझं मैदान आहे, माझं शहर आहे आणि मला याबद्दल इतरांपेक्षा जास्त नक्की माहितीये. मी वेगवेगळ्या प्रकारच्या विकेट्सशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मी आऊट होतो पण यामुळे रन्स नेमके कुठे येतील हे मला समजण्यास मदत होते.

IPL 2025 RCB vs DC
Mumbai Indians: चार पराभवानंतर MI ला प्लेऑफ गाठणं शक्य? कसं आहे Points Table चं समीकरण?

दिल्लीच्या टीमने केली कमाल

आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची प्रथम फलंदाजीची सुरुवात चांगली झाली होती, पण ओपनिंगच्या विकेट पडल्यानंतर टीमची अवस्था बिकट झाली. त्यामुळे आरसीबीच्या टीमने २० ओव्हर्सच्या सामन्यात १६३ रन्सपर्यंत मजल मारली.

IPL 2025 RCB vs DC
Riyan Parag: OUT की NOT OUT...! बाद झाल्यानंतर थेट अंपायरशी भिडला रियान पराग, अहमदाबादच्या मैदानात मोठा ड्रामा

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. आरसीबीने दिल्लीचे ५८ रन्समध्ये ४ विकेट्स काढले होते. पण त्यानंतर केएल राहुलने ५३ चेंडूत नाबाद ९३ रन्सची खेळी करत सामना एकतर्फी जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com