IND vs PAK T20 World Cup saam tv
Sports

IND vs PAK : विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पराभूत पाकिस्तानचे खेळाडू हँडशेकसाठी वाट पाहत राहिले? व्हिडिओ पाहा अन् खरं काय ते ठरवा

India vs Pakistan match highlights : टी20 विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत सुपर ८ मध्ये प्रवेश केला. मात्र सामन्यानंतर हँडशेक न झाल्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे नवा वाद रंगला आहे.

Namdeo Kumbhar

India vs Pakistan T20 handshake controversy explained : टी२० विश्वचषकातील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या झालेल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत सुपर ८ चे तिकिट मिळवले. सामन्यानंतर कोलंबोच्या मैदानात पुन्हा एकदा हँड शेकचा मुद्दा गाजला. नाणेफेकीवेळीच सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगासोबत हस्तोदंलन टाळलं. सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हँडशेक केल्याचं दिसत नाही. शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान तारीक यांचा हँडशेकसाठी थांबलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.यात नेमकं सत्य काय?

नेमका वाद काय आहे?

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू जल्लोष करत होते. तर पाकिस्तानचे खेळाडू शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान तारिक हे सामना संपल्यानंतर काही काळ मैदानातच थांबले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहीन आणि उस्मान हे भारतीय खेळाडूंसोबत हस्तांदोलन (Handshake) करण्यासाठी थांबल्याचा दावा केला जाोय. पण व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर शाहीन-तारीक हे फक्त मागे वळून भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनकडे पाहत असल्याचे दिसतेय. ते काही सेकंदातच तंबूत परतल्याचे दिसतेय.

व्हिडिओमध्ये काय दिसतंय?

  • शाहीन आफ्रिदी आणि उस्मान तारिक सामना संपल्यावर काही क्षणांसाठी थांबले.

  • दोघांनी मागे वळून भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनकडे पाहिले.

  • भारतीय खेळाडू आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते. भारताचा कोणत्याही खेळाडू हस्तांदोलनासाठी पुढे आला नाही.

  • कोणताही प्रतिसाद होत नसल्याचे पाहिल्यानंतर काही सेकंदात शाहीन आणि तारीख मैदानातून तंबूत निघून गेले.

भारताची 'नो-हँडशेक' पॉलिसी

मागील काही सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हँड शेक करणं टाळलं का? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेलच. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. पहलगम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्याचं धोरण स्वीकारलेय.

टीम इंडियाच्या शिलेदारांनी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हँडशेक न करण्याची घटना पहिल्यांदाच घडली नाही. महिला आणि पुरूष दोन्ही संघाकडून पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तादंलोन टाळलेय. आशिया चषकात सर्वात आधी भारतीय खेळाडूंनी हँडशेक करणं टाळले होते. त्यावेळीही क्रीडाविश्वात मोठी खळबळ माजली होती. हे एखाद्या खेळाडूने घेतलेले वैयक्तिक पाऊल नसून ते देशाच्या धोरणाशी जोडलेले आहे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संयम पाळतोय म्हणून... औलाद समजू नका, अजित पवार विमान अपघाताच्या बाबत रूपाली ठोंबरे आक्रमक

Salim Khan: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Airplane Seats: विमानातल्या सीटा निळ्या रंगाच्या का असतात? याचा नेमका अर्थ काय? वाचा एका क्लिकवर

Belly Fat Loss Tips: वजन कमी करण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ नक्की खा

IAS 3rd Marriage: आयएएस अधिकाऱ्याचे तिसरं लग्न, पहिल्या दोन्ही पत्नी IAS, तर आताची पत्नी आहे मंत्रालयात कामाला

SCROLL FOR NEXT