Rohit Sharma driving team bus of Mumbai Indians ahead of mi vs csk match video viral  twitter
Sports

Rohit Sharma Viral Video: 'आज बस तेरा भाई चलाएगा..', रोहितचा हटके अंदाज; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharam Driving Bus: रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात तो बस चालवताना दिसतोय.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. या संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला आहे. मुंबईचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. दरम्यान सामन्याच्या एक दिवसापूर्वी जेव्हा संघातील खेळाडू सराव करून हॉटेलमध्ये जात होते. त्यावेळी रोहित शर्मा बस चालवताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रोहित शर्मा नेहमीच आपल्या मजेशीर स्वभावामुळे चर्चेत असतो. त्याचे मैदानावर मस्ती करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. दरम्यान आता तो थेट बस चालवताना दिसून आला आहे. त्याचा हा मजेशीर अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. रोहितने स्टिअरिंग हातात घेताच फॅन्स व्हिडिओ आणि फोटो क्लिक करताना दिसून आले.

रोहितला काढून हार्दिककडे संघाची जबाबदारी..

रोहित शर्माने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून त्याने संघाला ५ वेळेस जेतेपद जिंकून दिलं आहे. रोहित हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. आधी हार्दिक पंड्याला ट्रेड करून आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरून काढलं आणि नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली.

मुंबई - चेन्नई आमने सामने..

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हे दोन्ही संघ या स्पर्धेत ३६ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने २० आणि चेन्नई सुपर किंग्जने १६ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT