Why hardik pandya not deserve place in team india for T20 world cup 2024 know the reasons  yandex
Sports

T20 World Cup 2024: हार्दिकला T-20 WC साठी भारतीय संघात स्थान मिळणं कठीण; ही आहेत ३ प्रमुख कारणं

Hardik Pandya In T20 World Cup 2024: हार्दिक पंड्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. काय आहेत प्रमुख कारणं? जाणून घ्या.

Ankush Dhavre

येत्या जून महिन्यात आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आयपीएल स्पर्धेत दमदार खेळ करणाऱ्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेसाठी प्राधान्य दिले जाऊ शकते. मात्र हार्दिक पंड्याला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार का? यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान अशी ३ कारणं आहेत ज्यामुळे हार्दिक पंड्याला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण दिसून येत आहे.

फिनिशिंग..

हार्दिक पंड्या आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यापूर्वी अनेकदा तो सामना फिनिश करताना दिसून आला आहे. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याचा स्ट्राइक रेटही कमी असल्याचं दिसून आलं आहे. या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये त्याला केवळ १२९ धावा करता आल्या आहेत.

फिटनेस..

फलंदाजी, गोलंदाजीसह तो आपल्या फिटनेससाठीही नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा तो दुखापतीमुळे संघाबाहेर असतो. दुखापतीपासून लांब राहावं म्हणून त्याने रेड बॉल क्रिकेटपासून स्वतःला दूर केलं आहे. यासह त्याने गोलंदाजी करणंही कमी केलं आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत गोलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे कित्येक महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. आता त्याने थेट आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक केलं आहे.

हार्दिक पंड्याची रिप्लेसमेंट..

हार्दिक पंड्या आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर संघाला विजय मिळवून देऊ शकतो. मात्र जर हार्दिकला संधी मिळाली नाही किंवा तो दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्याऐवजी शिवम दुबेला संधी दिली जाऊ शकते. शिवम दुबेने या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये १६० च्या स्ट्राईक रेटने १७६ धावा चोपल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT