Siddhi Hande
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी खाण्याची अनेकांची इच्छा होते. यावेळी जर काही कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही मेथी पकोडा बनवू शकतात.
मेथी, चना डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, कांदा, हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, पाणी, बेकिंग सोडा, तेल
सर्वात आधी तुम्हाला मेथी निसून घ्यायची आहे. मेथीची पाने वेगळी करायची आहेत.
मेथीची पाने बारीक चिरुन घ्या.
यानंतर एका मोठ्या भांड्यात चिरलेली मेथी, कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ टाकून मिक्स करा,
या मिश्रणात बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. यामध्ये एकदम थोडं पाणी टाका.
यानंतर हे मिश्रण भजीच्या पीठासारखे तयार करा. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जाड नसावे.
यानंतर कढईत तेल गरम करा. तेलात या मिश्रणाचे गोळे सोडा. हे भजी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
हे पकोडे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
Next: ख्रिसमससाठी बनवा स्पेशल कप केक, लहान मुलं होतील खूश, वाचा सोपी रेसिपी