PBKS vs RR, IPL 2024: पंजाब किंग्जला दुहेरी धक्का! पराभवानंतर शिखर धवनबाबत समोर आली वाईट बातमी

Shikhar Dhawan Injury Update: आयपीएल २०२४ स्पर्धेत २७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
big blow for punjab kings shikhar dhawan may ruled out of few matches of ipl 2024 amd2000
big blow for punjab kings shikhar dhawan may ruled out of few matches of ipl 2024 amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत २७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यादरम्यान पंजाबचा कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त झाला. यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. दरम्यान त्याच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवन संघात नव्हता. त्याच्याऐवजी सॅम करन पंजाब संघाचं नेतृत्व करताना दिसून आला. सामन्यानंतर धवनच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पंजाब किंग्ज संघाचे हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट संजय बांगर म्हणाले की, ' आम्हाला नक्कीच त्याची कमतरता जाणवली. त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो कदाचित येणाऱ्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. आम्हाला वाट पाहावी लागणार आहे. मात्र सद्यपरिस्थिती पाहता असं वाटतंय की, तो पुढील ७ ते १० दिवस बाहेर होऊ शकतो.

big blow for punjab kings shikhar dhawan may ruled out of few matches of ipl 2024 amd2000
LSG vs DC, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने लखनौचा 6 गडी राखून केला पराभव; ऋषभ पंतच्या संघाचा दुसरा विजय

पंजाबची सुमार कामगिरी..

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. या संघाने विजयी सलामी देत स्पर्धेला सुरुवात केली होती. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ४ गडी राखून विजय मिळवला होता.

big blow for punjab kings shikhar dhawan may ruled out of few matches of ipl 2024 amd2000
LSG vs DC, IPL 2024: 'मी तर DRS घेतलाच नव्हता..' लाईव्ह सामन्यात रिषभ अन् अंपायरमध्ये वाद! नेमकं काय घडलं?

त्यानंतर पुढील २ सामन्यांमध्ये पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्ज संघाला पराभूत केलं. त्यानंतर दमदार कमबॅक करत पंजाब किंग्ज संघाने दमदार कमबॅक केलं आणि गुजरात टायटन्स संघाला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभूत केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com