Surabhi Jayashree Jagdish
चहा हा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र काहींना चहा प्यायल्यानंतर अॅसिडीटी, छातीत जळजळ किंवा पोटात गॅसचा त्रास जाणवतो. यामागे चहामधील कॅफिन, टॅनिन आणि चुकीची बनवण्याची पद्धत ही मुख्य कारणं असतात.
योग्य प्रकारे चहा बनवला तर अॅसिडीटीचा त्रास मोठ्या प्रमाणात टाळता येतो. एसिडीटी होऊ नये म्हणून चहा कसा बनवाल हे आपण जाणून घेऊया.
चहामधील कॅफिन पोटात आम्लाची निर्मिती वाढवतं. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास अॅसिडीटीचा धोका जास्त वाढतो. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
चहा जास्त वेळ उकळल्यास त्यातील टॅनिन वाढतं. टॅनिनमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन गॅस आणि अॅसिडीटी वाढतं.
सकाळी उठताच चहा घेतल्यास पोटावर ताण येतो. याचा थेट त्वचेवर परिणाम होतो. म्हणून आधी थोडं खाणं किंवा कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
फुलक्रीम दूध पचायला जड असतं. दूध आणि चहा एकत्र असल्यास काही लोकांना त्याचा त्रास होतो. यामध्ये पोट फुगणं आणि अॅसिडीटी जाणवते.
चहा कमी वेळ उकळावा आणि पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं. दूध कमी किंवा टाळून हर्बल किंवा ग्रीन टी वापरावी. आल्याचा छोटा तुकडा किंवा वेलची घातल्यास पचन सुधारतं.
पांढरी साखर अॅसिडीटी वाढवू शकते. थोडा गूळ किंवा मध चहाला सौम्य बनवतं. यामुळे पोटावरचा ताण कमी होतो.