rishabh pant yandex
Sports

Rishabh Pant: विषय पैशांचा नव्हताच..! रिषभने दिल्लीची साथ का सोडली? पोस्ट शेअर करत म्हणाला...

Rishabh Pant On Delhi Capitals: गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सने घेतलेल्या निर्णयावर आपलं मत मांडलं आहे.

Ankush Dhavre

Rishabh Pant On Delhi Capitals: आयपीएल २०२५ स्पर्धेचं ऑक्शन सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी ५७४ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे.

त्यापैकी २०४ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या ऑक्शनमध्ये भारतीय क्रिकेटमधील काही स्टार खेळाडू देखील असणार आहेत. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे रिषभ पंत. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतला दिल्लीने रिलीज केलं आहे.

मेगा ऑक्शनपूर्वी सर्व १० फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. दिल्लीने जाहीर केलेल्या यादीत रिषभ पंतचं नाव नव्हतं. त्यावेळी रिषभने दिल्लीची साथ सोडण्याची कारणं सांगितली होती. आता स्वत: रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची साथ का सोडली यामागचं कारण सांगितलं आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकर यांनी रिषभ पंतने दिल्लीची साथ का सोडली असेल हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, रिषभ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मिळणाऱ्या रकमेवर सहमत नसेल, म्हणून त्याने या संघाची साथ सोडली असावी.

रिषभ पंत काय म्हणाला?

सुनील गावसकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर रिषभ पंतने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन आपलं मत मांडलं आहे. रिषभने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ' माझं रिटेन्शन आणि पैशांचा काही संबंध नव्हता, हे मी ठामपणे सांगू शकतो...',

रिषभ पंत आधीपासूनच दिल्लीसाठी खेळतोय. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीने आगामी हंगामासाठी ४ खेळाडूंना रिटेन केलं आहे. दिल्लीने अक्षर पटेलला १६.५ कोटी, कुलदीप यादवला १३.५ कोटी, ट्रिस्टन स्टब्सला १० कोटी आणि अभिषेक पोरेलला ४ कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT