IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! प्रमुख फलंदाजाला बसवलं

Tema India Squad For ODI Series Against Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! प्रमुख फलंदाजाला बसवलं
team indiatwitter
Published On

India W vs Australia W : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या संघात आक्रमक फलंदाज शेफाली वर्माला स्थान देण्यात आलेलं नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, आऊट ऑफ फॉर्म असल्यामुळे तिला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर हरमनप्रीत कौर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने हे ब्रिस्बेनमध्ये खेळले जाणार आहेत. त्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना पर्थच्या WACA स्टेडियममध्ये खेळला जाईल.

या मालिकेला ५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना ८ डिसेंबरला आणि मालिकेतील तिसरा सामना ११ डिसेंबरला खेळला जाणार आहे. या महत्वाच्या मालिकेतून शेफाली वर्माला बाहेर का ठेवलं गेलं, याबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! प्रमुख फलंदाजाला बसवलं
IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

कसा राहिलाय शेफाली वर्माचा रेकॉर्ड?

शेफाली वर्मा ही भारतीय महिला संघातील युवा आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे. ती आपल्या निर्भिड फलंदाजीसाठी ओळखली जाते. तिच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत २९ सामने खेळले आहेत.

यादरम्यान तिने ६४४ धावा केल्या आहेत. यादरम्यान ७१ धावा ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. तिची गेल्या ३ सामन्यातील कामगिरी पाहिली, तर तिने १२,११ आणि ३३ धावांची खेळी केली.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! प्रमुख फलंदाजाला बसवलं
IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, यास्तिका भाटीया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणि, प्रिया मिश्रा, राधा यादव, टिटास साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर आणि साइमा ठाकोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com