IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

India vs South Africa Live Streaming Details: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिकेचा थरार रंगणार आहे.
IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?
ind vs ausyandex
Published On

When And Where To Watch India vs Australia Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या २२ नोव्हेंबरपासूना सुरु होणार आहे.

या सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना डे- नाईट क्रिकेट सामन्याचा थरार अनुभवायाला मिळणार आहे. दरम्यान ही मालिका कुठल्या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा नसणार आहे. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण केएल राहुल सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला होता.त्यानंतर शुभमन गिललाही दुखापत झाली होती.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?
IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला केव्हा सुरुवात होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामने किती वाजता सुरु होतील?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार ५ वाजता सुरु होतील. तर डे- नाईट कसोटी सामना सकाळी ९:३० वाजता सुरु होईल.

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येतील.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचं काय खरं नाय..पर्थ कसोटीत भारताचा हा खतरनाक गोलंदाज करणार पदार्पण

भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येतील.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?
IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, विराट कोहली, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के.एल. राहुल, हर्षित राणा, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलिया -पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com