Rishabh Pant: तुम्हीच ठरवा..! आऊट की नॉट आऊट? पंतच्या विकेटनंतर मोठा गदारोळ
वभारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा सामना वानखेडेच्या मैदानावर खेळवला जातोय. या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावामध्ये ऋषभ पंतच्या विकेटवरून मोठा गदारोळ झाल्याचं दिसून येतंय. पंत क्रिझवर असेपर्यंत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित होत्या. दरम्यान विकेटनंतर पंत आऊट होता की नॉटआऊट हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
नेमकं काय घडलं?
असा दावा करण्यात येतोय की, कॅचच्या अपीलनंतर तिसऱ्या अंपायरने पंतला चुकीचं आऊट दिलंय. पंतही पंचांच्या निर्णयावर नाराज दिसून आला. मात्र अंपायरच्या निर्णयानंतर चांगली खेळी करून पंतला माघारी परतावं लागलं.
पंत आऊट की नॉट आऊट?
एजाज पटेल गोलंदाजी करत होता. यावेळी २१ व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलचा सामना पंतने केला. यावेळी पंतच्या पॅडला लागून बॉल वर उडाला आणि विकेटकीपर टॉम ब्लंडलच्या हातात गेला. यावेळी मैदानी अंपायरने त्याला नॉट आऊटचा करार दिला. मात्र न्यूझीलंडने डीआरएस घेतला.
यावेळी रिव्ह्यू अल्ट्राएजमध्ये हलका स्पाईक दिसून आला. यावेळी बॉल बॅटच्या जवळ होती. मात्र बॅट पॅडला देखील लागली होती. त्यानंतर बॉल पंतच्या पॅडवर आदळल्यानंतर मोठा स्पाईक दिसून आला. यावेळी पहिला स्पाईक पाहून थर्ड अंपायरने पंतला आऊट करार दिला. मात्र पंतला हा निर्णय मान्य नव्हता.
पंतचं म्हणणं काय?
थर्ड अंपायर निर्णय देण्यापूर्वीच पंत मैदानी अंपायरकडे पोहोचला. यावेळी त्याने पहिला आलेला हलका स्पाईक हा बॅट पॅडला लागलेल्या आवाजाचा असल्याचं सांगितलं. पंतच्या म्हणण्यांनुसार बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. तो आवाज बॅट पॅडला लागल्यामुळे आला आहे. यावेळी पंतने अंपायरला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र अखेरी थर्ड अंपयारचा निर्णय त्याला मानावा लागला आणि तो पव्हेलियनमध्ये गेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.