T20 World Cup: 'इतनी खुशी...! तीन बॉल २ विकेट; बुमराहच्या चेंडूवर हेटमायरचा गेम ओव्हर,जसप्रीत बुमराहाची रिअॅक्शन बघितली का?

Bumrah Reaction Goes Viral : ईडन गार्डन्सवर झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक सुपर ८ सामन्यात जसप्रीत बुमराहने तीन चेंडूत दोन विकेट घेतल्या. शिमरॉन हेटमायरची विकेटही बुमराहने घेतली आहे.
Jasprit Bumrah celebrates after dismissing Shimron Hetmyer during the ICC T20 World Cup Super 8 match at Eden Gardens, Kolkata.
Jasprit Bumrah celebrates after dismissing Shimron Hetmyer during the ICC T20 World Cup Super 8 match at Eden Gardens, Kolkata.saam tv
Published On
Summary
  • जसप्रीत बुमराहची तीन चेंडूत दोन विकेटची कामगिरी.

  • शिमरॉन हेटमायरची महत्त्वाची विकेट भारतासाठी निर्णायक ठरली.

  • ईडन गार्डन्सवर सुपर ८ सामन्यात रंगतदार लढत.

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकातील ५२ वा सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जातोय. सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सामन्यात कोणताही बदल न करता प्रवेश केला. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणारा हा सुपर ८ सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे. दरम्यान सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहची एक धमाल रिअॅक्शन पाहायला मिळाली.

वेस्ट इंडिजकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी शाई होप आणि रोस्टन चेस सलामीवीर म्हणून मैदानात आले. दोघांनीही सावध सुरुवात केली. त्यावेळी बुमराह पाचवे षटक टाकण्यासाठी आला. त्याने संधी निर्माण केली, पण अभिषेक शर्माने एक झेल सोडला. सहा षटकांनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या ४५-० होती. त्यानंतर विकेटच्या शोधात असलेल्या भारतीय संघाला वरुण चक्रवर्तीने पहिली विकेट मिळवून दिली. त्याने शाई होपला बाद करून भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. होपने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या. तर वेस्ट इंडिज संघाच्या धावा ६८ झाल्या होत्या.

Jasprit Bumrah celebrates after dismissing Shimron Hetmyer during the ICC T20 World Cup Super 8 match at Eden Gardens, Kolkata.
Abhishek Sharma : अभिषेक शर्माकडून सर्वात मोठी चूक, मॅच विनर खेळाडूचा सोप्पा कॅच सोडला, सूर्याची रिअॅक्शन व्हायरल

त्यानंतर १२ व्या षटकात जसप्रीत बुमराहने विंडीजला आणखी एक धक्का दिला. त्याने १०२ धावांवर हेटमायरला बाद केले. १२ चेंडूत २७ धावा काढून हेटमायर बाद झाला. त्याच षटकात बुमराहने विंडीजला आणखी एक धक्का दिला. हेटमायरला चेंडू टाकल्यानंतर त्याच्या बॅटचा कट लागून चेंडू संजू सॅमसंगच्या हातात गेला. त्यावेळी यष्टीरक्षक संजू सॅमसंगनं आणि बुमराहनं विकेटसाठी अपील केली.

Jasprit Bumrah celebrates after dismissing Shimron Hetmyer during the ICC T20 World Cup Super 8 match at Eden Gardens, Kolkata.
Alyssa Healy: ऐन एकदिवसीय सामन्याच्या दरम्यान क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय, अखेरच्या सामन्यात झळकावले शतक

अंपायरनं बाद झाल्याचं म्हटल्यानंतर हिटमायरनं तिसऱ्या अंपायरकडे नॉट आऊट असल्याची अपील डीआरएसच्या माध्यमातून घेतली. त्यानंतर डीआरएसनंतर अंपायरनं त्याला बाद करार केलं. त्यावेळी बुमराहच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता. चक्रवतीनं विकेट मिळवून दिल्यानंतर भारतीय संघला अजून एक दोन विकेट हव्या होत्या. त्यावेळीच बुमराहनं हेटमायरला झेल बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com