MS Dhoni Latest Marathi News, Cricket News Updates Saam TV
Sports

MS Dhoni: धोनी बॅट का चावतो? अमित मिश्राने दिले उत्तर...

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) रविवारी पुन्हा एकदा आपली बॅट खाताना दिसला.

Pravin

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) रविवारी पुन्हा एकदा आपली बॅट खाताना दिसला. त्याचा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि व्हायरल होत आहे. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार की धोनीला बॅट चावण्याची खूप विचित्र सवय आहे. डगआऊट किंवा ड्रेसिंग रूममध्ये तो अनेकदा त्याची बॅट चावताना दिसला आहे. आता, त्याचा माजी भारताचा सहकारी अमित मिश्राने (Amit Mishra) अखेर खुलासा केला आहे की धोनी त्याची बॅट का चावतो. (MS Dhoni Latest Marathi News)

4 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हे अनोखे काम का करतो याचा खुलासा अमित मिश्राने केला आहे. तो म्हणाला धोनी हा आपल्या बॅटची काळजी घेतो, खेळताना बॅटमधून कसलाही धागा निघू नये म्हणून धोनी असे करताना दिसतो. पुढे अमित मिश्रा म्हणाला की जर तुम्ही विचार करत असाल की धोनी अनेकदा त्याची बॅट का चावतो, तर तो बॅटची टेप काढण्यासाठी असे करतो कारण त्याला त्याची बॅट स्वच्छ आवडते. तुम्ही कधीही खेळताना धोनीच्या बॅटमधून कोणताही धागा किंवा टेप निघताना पाहिला नसेल. (MS Dhoni Eating Bat)

महेंद्रसिंग धोनी 41 च्या जवळपास असेल परंतु त्याने हे दाखवून दिले आहे की सध्याच्या आयपीएल 2022 मध्ये त्याच्यासाठी वय हा फक्त एक नंबर आहे. महेंद्रसिंग धोनी सध्या ४१ वर्षांचा आहे. यंदाच्या हंगामात त्याची फलंदाजी पाहता त्याने दाखवून दिले आहे की Age Is Just A Number. गेल्या आठवड्यात चेन्नईच्या संघाचे कर्णधार पद जडेजाकडून धोनीकडे आले. कर्णधार पद आल्यापासून धोनीने दोन सामने जिंकून दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ प्लेऑपमध्ये जाईल असे वाटत होते, परंतु आता प्लेऑफचा रस्ता अवघड आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT