IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी धक्का; दिग्गज खेळाडू रुग्णालयात दाखल

DC vs CSK Match : दिल्लीचा खेळाडू पृथ्वी शॉ अचानकपणे आजारी पडला आहे. अंगात ताप भरल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत
Prithvi Shaw
Prithvi ShawSaam Tv
Published On

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात रविवारी दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत (Delhi Capitals vs Chennai Super Kings) होणार आहे. सामन्याला अवघे काही तास शिल्लक उरले असताना दिल्ली कॅपिटल्स संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. सुरूवातीला संघातील एका वेगवान गोलंदाजाला कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीचाच दिग्गज खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आजारी असल्याचं समोर आलं आहे. अंगात ताप भरल्यामुळे आपण रुग्णालयात दाखल झालो असल्याची माहिती स्वत: पृथ्वी शॉ ने त्याच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. (IPL 2022 Latest News)

Prithvi Shaw
ख्रिस गेलची आयपीएलमध्ये पुन्हा एन्ट्री; 'या' संघासाठी खेळणार ?

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्ज संघासोबत दोन हात करणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) हा सामना सुरू होणार आहे. या सामन्यात दोनही संघाला विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी आपली तयारी पूर्ण केलेली आहे. मात्र दिल्लीचा खेळाडू पृथ्वी शॉ अचानकपणे आजारी पडला आहे. अंगात ताप भरल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो लवकरच बरा होऊन पुन्हा एकदा संघात सामील होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

वेगवान गोलंदाजाला कोरोनाची लागण

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श, फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर डॉ. अभिजित साळवी आणि सोशल मीडिया कंटेंट टीम सदस्य आकाश माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना विलीनीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आता दिल्लीच्या नेटमध्ये सराव करणाऱ्या गोलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे. या गोलंदाजासोबत ज्या खेळाडूंनी रुम शेअर केलेली आहे, त्या सर्वांनाच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एकीकडे पृथ्वी शॉ आजारी पडला आहे तर दुसरीकडे संघासमोर करोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे दिल्ली संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com