team india saam tv news
क्रीडा

Team India Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ५ प्रबळ दावेदार; यादीत ३ भारतीयांचा समावेश

Ankush Dhavre

Team India Head Coach:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसह राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपर्यंत होता. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या पराभवासह भारतीय संघाचं तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नं स्वप्नच राहिलं आहे. दरम्यान ५ दिग्गज क्रिकेटपटू आहेत जे राहुल द्रविडची जागा घेऊ शकतात.

आशिष नेहरा :

भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा हा मैदानावर असताना नेहमी शांत राहुन गोलंदाजी करताना दिसून यायचा. त्याचं शार्प क्रिकेटिंग माईंड भारतीय संघासाठी फायदेशीर ठरु शकतं. आयपीएल स्पर्धेत तो गुजरात टायटन्स संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतो. या संघाला त्याने आयपीएल २०२२ स्पर्धेत जेतेपद मिळवून दिलं होतं. तर २०२३ मध्ये झालेल्या हंगामातही गुतरातचा संघ अंतिम फेरील दाखल झाला होता. बीसीसीआय लवकर अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करेल. आशिष नेहरा देखील भावी मुख्य प्रशिक्षकासाठी प्रबळ दावेदार आहे.

स्टीफन प्लेमिंग:

न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्टीफन प्लेमिंग हा देखील भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. मोठ्या स्पर्धा कशा जिंकायच्या हे स्टीफन प्लेमिंगला चांगलच माहीत आहे. (Latest sports updates)

टॉम मूडी:

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू टॉम मूडी हे आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाज संघाला प्रशिक्षण देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सनरायझर्स हैदाराबादने १ वेळेस आयपीएलच्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. त्यांनी २०१७ मध्ये भारताच्या मुख्यप्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली होती. मात्र त्यावेळी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली होती. यावेळीही ते मुख्यप्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार आहे. (Latest sports updates)

वीरेंद्र सेहवाग:

वीरेंद्र सेहवाग हा आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीसाठी ओळखला जायचा. तो जर भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला तर भारतीय संघातील खेळाडू आक्रमक होऊन खेळताना दिसून येऊ शकतात. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ब्रँडन मॅक्क्यूलमने इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज कसोटीतही आक्रमक खेळ करताना दिसून येत आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण :

व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. सध्या ते NCA प्रमुखांची भूमिका पार पाडत आहे. राहुल द्रविडच्या अनूपस्थितीत अनेकदा ते मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून आले आहेत. त्यामुळे राहुल द्रविडनंतर ही जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

SCROLL FOR NEXT