Virender Sehwag Tweet: वीरेंद्र सेहवागला सगळं आधीच माहीत होतं? 'इंडिया VS भारत' वादादरम्यान वीरुचं जुनं ट्वीट व्हायरल

Virender Sehwag Tweet: वीरेंद्र सेहवागचं ट्विट चर्चेत आलं आहे.
virender sehwag
virender sehwagsaam tv

virender sehwag tweet:

केंद्र सरकार 'इंडिया'नाव बदलून भारत करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देखील 'जी-२०' साठी राष्ट्राध्यक्ष आणि मंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या रात्रीच्या भोजनाच्या निमंत्रणाच्या लेटरहेडवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असं लिहिण्यात आलं आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, वीरेंद्र सेहवागचं ट्विट चर्चेत आलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रपतींनी लेटरहेडवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' लिहिण्यात आल्याने राजकीय आणि मनोरंजन सृष्टीत देखील चर्चांना उधाण आलं आहे. काही जण 'भारत' नावाला पाठिंबा देत आहेत. तर काहीजण 'इंडिया' नावाचं समर्थन करताना दिसत आहे. (Virender Sehwag Latest News)

virender sehwag
Rohit Sharma Statement: असले प्रश्न अजिबात विचारू नका, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्मा भडकला, Video

'इंडिया' नाव बदलायची चर्चा सुरू होण्याआधीचं वीरेंद्र सेहवागचं जुनं ट्विट व्हायरल झालं आहे. वीरेंद्र जुन्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'पावसाच्या दिवसात चहा आणि पकोडे खाण्याचा कार्यक्रम ठेवला असता, मात्र यांनी आशिया कप आयोजित केला आहे'. तसेच #BHAvsPAK' असं हॅशटॅग देखील त्यानं दिलं'.

सेहवागच्या या जुन्या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यांने म्हटलं की, 'वीरेंद्र सेहवागला सगळं आधीच माहीत होतं?' असा प्रश्न वीरेंद्र सेहवागला केलं. या नेटकऱ्याला वीरेंद्र सेहवागने उत्तर दिलं आहे.

सेहवाग उत्तर देताना म्हणाला की, 'मला विश्वास आहे की, आपलं अभिमान जागृत करणारं नाव असावं. आपण भारतीय आहोत, 'इंडिया' हे नाव ब्रिटीशांची देणगी आहे. आपलं मूळ नाव 'भारत' असून ते मिळण्यास बराच काळ लोटला. माझी यंदा बीसीसीआय आणि जय शहा यांना आग्रहाची विनंती राहील की, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या खेळाडूंच्या छातीवर भारत असेल अशी खात्री आहे.

virender sehwag
World Cup 2023 Squad: मिशन 'वनडे वर्ल्डकप'साठी टीम इंडियाची घोषणा! या 15 खेळाडूंना मिळालं स्थान

अमिताभ बच्चन यांचंही ट्वीट चर्चेत

दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांचंही ट्विट चर्चेत आलं आहे. "T 4759 - भारत माता की जय" अशा आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. बीग बी यांचं ट्विट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला काही मिनिटांत चौदा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनीही कमेंट्सचाही वर्षाव केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com