आयपीएल २०२४ स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपतेय. जेव्हा जेव्हा संघाला गरज पडते तेव्हा तो फलंदाजीत योगदान देतोय. गेल्या सामन्यात शतक झळकवूनही त्याला स्लो बॅटिंगमुळे ट्रोल केलं गेलं होतं. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे मनीष पांडेनंतर झळकावलेलं सर्वात स्लो शतक होतं. दरम्यान आता वेस्टइंडीजचा माजी खेळाडू ब्रायन लाराने मोठं वक्तव्य केलं आहे.
ब्रायन लारा म्हणाले की, ' स्ट्राइक रेट हा फलंदाजी क्रमवार अवलंबून असतो. सलामीवीर फलंदाजासाठी १३०-१४० चा स्ट्राइक रेट वाईट नाही. मात्र जर तुम्ही मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी येत असलं तर तुम्हाला १५०-१६० च्या स्ट्राइक रेटने धावा कराव्या लागतात. जे आपण या हंगामातही पाहिलं आहे. इथे फलंदाज शेवटच्या षटकांमध्ये २०० च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहेत.'
तसेच ते पुढे म्हणाले की, ' कोहलीसारखा सलामीवीर फलंदाज १३० च्यास स्ट्राइक रेटने सुरुवात करतो त्यानंतर त्याला १६० च्या स्ट्राइक रेटने डाव संपवण्याची संधी असते.' विराट आणि रोहित ही जोडी सलामीला जाणं हा योग्य पर्याय असू शकतो. मात्र त्यांनी रोहितसोबत सलामीला कोण जाणार यासाठी पर्याय सुचवला आहे. (Cricket news in marathi)
ते म्हणाले की, ' वेस्टइंडीजमध्ये सलामीला जाण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा हा परफेक्ट ऑप्शन असू शकतो. मात्र मला असं वाटतं की, डावाची सुरुवात करायला कोणीतरी युवा खेळाडू असावा. तर अनुभवी खेळाडू मध्यक्रमात डाव सांभाळण्यासाठी असावा. सलामीला आलेले अनुभवी खेळाडू लवकर बाद झाले tsrcs संघावर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे मी रोहित आणि विराटपैकी एकाला टॉप ऑर्डरमध्ये तर एकाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बोलवेल.' असं ब्रायन लारा म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.