Virat Kohli News: विराट सचिनचा १०० शतकांचा रेकॉर्ड मोडूच शकत नाही!दिग्गज खेळाडूने कारणही सांगितलं

Brian Lara On Virat Kohli: वेस्टइंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी म्हटलंय की, विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडून काढू शकत नाही.
sachin-tendulkar-with-virat-kohli
sachin-tendulkar-with-virat-kohlisaam tv news
Published On

Brian Lara On Virat Kohli:

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा रेकॉर्ड कोण मोडणार? असा प्रश्न जेव्हा सचिनला विचारला गेला होता तेव्हा त्याने विराट आणि रोहितचं नाव घेतलं होतं. हे त्याने तेव्हा म्हटलं होतं जेव्हा हे दोघेही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन होते.

वर्तमान स्थिती पाहता विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडून काढू शकतो. मात्र वेस्टइंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी म्हटलंय की, विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडून काढू शकत नाही.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला होता. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८० शतकं झळकावली आहेत.१०० शतकं झळकावण्यासाठी त्याला २० शतकांची गरज आहे. असं असतानाही ब्रायन लारा यांचं म्हणणं आहे की, विराट सचिनचा रेकॉर्ड मोडेल हे म्हणणं लॉजिकल नाहीये.

वेस्टइंडिजचे माजी खेळाडू ब्रायन लारा यांनी आंनदबाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले की,'आता विरट किती वर्षांचा आहे?३५ वर्षांचा ना?त्याने आतापर्यंत ८० शतके झळकावली आहेत. त्याला २० शतकांची गरज आहे. त्याने दरवर्षी ५ शतकं झळकावली तर २० शतकं करण्यासाठी त्याला ५ वर्ष लागतील. तोपर्यंत तो ३९ वर्षांचा होईल. कठीण आहे.. हे खूप कठीण आहे.'

sachin-tendulkar-with-virat-kohli
IPL 2024: हार्दिकला मुंबई इंडियन्स संघात घेण्याचं नेमकं कारण काय?

तसेच ते पुढे म्हणाले की, 'सचिनचा रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही हे मी ठामपणे सांगु शकत नाही. विराट सचिनचा १०० शतकांचा रेकॉर्ड मोडेल असं म्हणणारे लॉजिकली बोलत नाहीत. २० शतकं ही खूप मोठी गोष्ट आहे. काही खेळाडूंना तर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत २० शतकं झळकावता येत नाहीत. मी उत्साहीत होऊन असं मुळीच म्हणणार नाही की, तो सचिनचा रेकॉर्ड मोडेल.' (Latest sports updates)

sachin-tendulkar-with-virat-kohli
Gambhir- Sreesanth Fight: निवृत्तीनंतरही श्रीसंतचा राग तसाच!थेट गंभीरला भिडला; वादाचा Video व्हायरल

कोहली रेकॉर्डच्या जवळ जाऊ शकतो..

तसेच ते पुढे म्हणाले की,'कोहली या रेकॉर्डच्या जवळ पोहचू शकतो. त्याच्या समर्पणाचा आणि अनुशासनाचा मी मोठा फॅन आहे. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. जर त्याने सचिनचा रेकॉर्ड मोडून काढला तर मला खूप आनंद होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com