shakib al hasan on virender sehwag google
क्रीडा

Shakib Al Hasan Statement: 'कोण सेहवाग..?' पत्रकाराच्या प्रश्नावर शाकिब अल हसनचं वादग्रस्त वक्तव्य

Shakib Al Hasan On Virender Sehwag: वीरेंद्र सेहवागने केलेल्या वक्तव्यावर शाकिब अल हसनने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन आपल्या खेळामुळे कमी आणि उद्धटपणामुळेच अधिक चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटच्या मैदानाबाहेर त्याचे अनेक वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. मात्र आता त्याने थेट भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शाकिब अल हसन सध्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. शाकिब अल हसन हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याची ही सुमार कामगिरी पाहता वीरेंद्र सेहवागने त्याच्यावर जोरदार टीका केली होती.

बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये १० जून रोजी अटीतटीची लढत पार पडली होती. या सामन्यात बांगलादेशने हातचा सामना गमावला होता. त्यावेळी वीरेंद्र सेहवागने शाकिब अल हसनवर टीका करत त्याला निवृत्त होण्याचा सल्ला देखील दिला होता. त्यानंतर १३ जून रोजी नेदरलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४६ चेंडूंचा सामना करत ६४ धावांची तुफानी खेळी केली.

या खेळीनंतर त्याने पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला वीरेंद्र सेहवागबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. एका पत्रकाराने त्याला या स्पर्धेतील कामगिरीबाबद प्रश्न विचारल होता, ज्यात त्याने सेहवागचाही उल्लेख केला. पत्रकाराचा प्रश्न संपलाही नव्हता, इतक्यात शाकिब अल हसन, कोण सेहगाव? असं म्हणाला. त्याचं हे उत्तर ऐकताच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काय म्हणाला शाकिब अल हसन?

शाकिब अल हसन म्हणाला की, 'कोणताच खेळाडू हा टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी खेळत नाही. संघासाठी योगदान देणं हे खेळाडूचं प्रमुख काम आहे. मात्र खेळाडू जर असं करु शकत नसेल, तर नक्कीच चर्चा होणार.'

काय म्हणाला होता वीरेंद्र सेहवाग?

सेहवाग म्हणाला की, 'त्याला अनुभवाच्या बळावर संघात स्थान दिलं गेलं आहे. त्याने कमीत कमी खेळपट्टीवर जाऊन वेळ घालवला पाहिजे. तो काय अॅडम गिलख्रिस्ट किंवा मॅथ्यू हेडन नाही, जो शॉर्ट चेंडूवर पुल शॉट मारेल. तो बांगलादेशचा खेळाडू आहे. आपल्या स्टँडर्डनुसार खेळ करावा. जर हुक किंवा पुल शॉट खेळता येत नसेल, तर तेच शॉट खेळावे जे खेळता येतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT