VIRAT KOHLI Saam tv news
Sports

Virat Kohli: 'मी नाही ओळखत...कोण विराट? ', चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर रोनाल्डोचं उत्तर; पाहा Video

Virat Kohli- Ronaldo: विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट हा गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटपटू आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli- Ronaldo News:

विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट हा गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटपटू आहे. लहान मुलालाही विचारलं की, विराट कोहली कोण आहे तर तो क्षणात उत्तर देईल. दरम्यान प्रसिद्ध युट्यूबर स्पीडने रोनाल्डो विराट कोहली कोण आहे?असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर रोनोल्डोने जे उत्तर दिलं आहे ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटपटू..

काही दिवसांपूर्वीच गुगलने गेल्या २५ वर्षात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सेलिब्रिटिंची यादी जाहीर केली होती. या यादीत शाहरुख खानसह विराट कोहलीचाही समावेश होता. तसेच तो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू देखील आहे.

त्याचे इंस्टाग्रामवर २६५ मिलियन फॉलोवर्स आहेत. यावरुन तुम्हाला कळलच असेल की तो किती लोकप्रिय आहे. मात्र फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडूला विराट कोण आहे? हे माहितच नाही.

ब्राझीलचा दिग्गच फुटबॉलपटू रोनाल्डोला विरा कोहली कोण आहे. हे माहितच नव्हतं. दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

काय चर्चा झाली?

स्पीड - तुला विराट कोण आहे हे माहितेय का?

रोनाल्डो - कोण?

स्पीड-माजी वर्ल्डकप विजेता खेळाडू भारताचा विराट कोहली.

रोनाल्डो -नाही

स्पीड- तू विराटला ओळखत नाहीस?

रोनाल्डो- कोण आहे तो? तो खेळाडू आहे का?

स्पीड- क्रिकेटपटू आहे

रोनाल्डो- तो इथे प्रसिद्ध नाही

स्पीड- तो बेस्ट आहे, बाबर आझमपेक्षाही बेस्ट आहे. तू त्याला कधीच पाहिलं नाही. त्यानंतर स्पीडने त्याला विराट कोहलीचा फोटो दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : बाकी डबेसोडून रेल्वेचं इंजिन पळालं पुढे; रेल्वेचं कपलिंग अचानक तुटलं

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

मुलींना वयाने मोठे पुरुष का आवडतात? कारणे जाणून घ्या

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

SCROLL FOR NEXT