ruturaj gaikwad and utkarsha pawar  instagram
Sports

Ruturaj Gaikwad's Wife: गायकवाडांची होणारी सून नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल सर्व काही

Who Is Utkarsha Pawar: ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल अधिक माहिती.

Ankush Dhavre

Ruturaj Gaikwad Marriage: आयपीएल २०२३ स्पर्धा नुकताच पार पडली. चेन्नई सुपर किंग्ज संघाने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. या संघाचे प्रतिनिधित्व करणारा ऋतुराज गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तो येत्या ३-४ जूनला विवाह बंधनात अडकणार आहे. याच कारणामुळे त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालला संधी दिली गेली आहे.

ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल अधिक माहिती.

कोण आहे उत्कर्षा पवार?

ऋतुराज गायकवाड प्रमाणेच उत्कर्षा देखील क्रिकेटपटू आहे. ती देखील पुण्यात राहते. तिचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने एक फोटो शेअर केला होता.

ज्यात एमएस धोनीसह उत्कर्षा पवार असल्याचे दिसून आले होते. त्याने या पोस्टला, माझ्या आयुष्यातील दोन VVIP'S असं कॅप्शन दिलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्षा वयाच्या ११ व्या वर्षापासून प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे. सध्या ती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करते.

ती एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू असून, नुकताच ती वुमेन्स सिनियर वनडे ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून आली होती. तिने आपलं शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलं आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवड..

ऋतुराज गायकवाडची आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती.

मात्र त्याने न जाण्याचा निर्णय घेतल्याने यशस्वी जयस्वालला संधी दिली गेली आहे. यशस्वी जयस्वालने देखील आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे.

याच कामगिरीची दखल घेत त्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान दिलं गेलं आहे. त्याने इंग्लंडमध्ये जाऊन सराव करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

SCROLL FOR NEXT