Ruturaj Gaikwad Marriage: ऋतुराज गायकवाडची होणारी बायको दिसते तरी कशी? क्यूट कपलचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल - Photo

Who Is Utkarsha Pawar: चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर या कपलने फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
ruturaj gaikwad
ruturaj gaikwadinstagram

Ruturaj Gaikwad Wife: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रवींद्र जडेजाच्या आक्रमक खेळीच्या बळावर चेन्नईने या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला.

यासह जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर आता चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ruturaj gaikwad
IPL 2023 Winner: धोनीची CSK पाचव्यांदा चँम्पियन; चेन्नईने ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचं ट्विट

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज गायकवाड आपली प्रेयसी उत्कर्षासोबत ३ ते ४ जून दरम्यान लग्न करू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर या कपलने फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Ruturaj Gaikwad Girlfriend Utkarsha Pawar With Ipl Trophy)

नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नईने पाचवे जेतेपद मिळवत मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या विजयानंतर संघातील खेळाडू आपल्या पत्नी आणि कुटुंबासह ट्रॉफी सोबत फोटो क्लिक करताना दिसून आले होते. त्यावेळी ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवार सोबत फोटो क्लिक करताना दिसून आला आहे. (Latest sports updates)

इतकेच नव्हे तर त्याने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा ट्रॉफी सोबत फोटो क्लिक करताना दिसून आले आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये या कपलने एमएस धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने VVIP ऑफ माय लाईफ असं लिहिलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघे एकत्र जिम करताना देखील दिसून आले होते. तसेच ऋतुराज गायकवाडचा आयपीएल स्पर्धेतील ५० वा सामना पाहण्यासाठी उत्कर्षाने हजेरी लावली होती.

ज्याचा फोटो ऋतुराज गायकवाडने आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये डेवोन कॉनव्हेची पत्नी किमसह आणखी एक मुलगी असल्याचं दिसून येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी घातलेली ही मुलगी उत्कर्षा असल्याचे दिसून येत आहे. त्याने तिला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com