IPL 2023 Winner Team: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील फायलन सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सवर शेवटच्या चेंडूवर दणदणीत विजय मिळवला. रविंद्र जडेजा हा चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने शेवटच्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयासह चेन्नईने आयपीएलच्या ट्रॉफीवर पाचवेळा आपलं नाव कोरलं. (Latest sports updates)
चेन्नईच्या या विजयानंतर क्रिडाजगतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. मुंबई इंडियन्सने देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत चेन्नईला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चेन्नईने आता पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली असून मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे.
चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि आता २०१३ अशा एकूण ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या टीमने देखील २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षात आयपीएल फायनलमध्ये विजय मिळवला आहे. (Indian Premier League 2023)
दरम्यान, चेन्नईने (CSK) सुपरकिंग्जच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सने एक ट्विट केलं आहे. पलटणने अवघ्या ४ शब्दांचं हे ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचं या शानदार विजयासाठी अभिनंदन केलं आहे. मुंबईकडून चेन्नईचं कौतुकं करणारं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी २१५ धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र चेन्नईच्या बॅटिंगला (Sport News) सुरुवात झाल्याच्या ३ बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार १५ ओव्हर्समध्ये विजयासाठी १७१ धावांच सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.