Avani Lekhara Indian Paralympian & Rifle Shooter saam tv
Sports

आधी गॉलब्लॅडर काढलं, 5 महिन्याआधी शस्त्रक्रिया; गोल्ड मेडल जिंकणाऱ्या Avani Lekhara चा संघर्षमय प्रवास कसा आहे?

Who Is Avani Lekhara: भारताची स्टार पॅरा शूटर अवनी लेखराने शूटींगमध्ये भारताला पदक जिंकून दिलं आहे. दरम्यान कसा राहिलाय तिचा प्रवास? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Avani Lekhara Indian Paralympian & Rifle Shooter: मनात जिद्द आणि काहीतरी करुन दाखवण्याची धमक असेल, तर कुठलच काम कठीण नसतं. आपल्या आयुष्यात अनेक संकटं येतात, पण आपण काहीतरी कारण देऊन त्या संकटांना पाठ फिरवतो.

मात्र कितीही अडचणी येऊद्या, आपल्या मनात जिद्द असेल तर आपण अशक्य ते शक्य करुन दाखवू शकतो. हे पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू सिद्ध करुन दाखवतोय.भारताच्या अवनी लेखराचा (Avani lekhara) संघर्षही अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकल्यानंतर अवनी लेखराने इतिहास रचला होता. तिच्यासमोर आपलं गोल्ड मेडल राखण्याचं आव्हान होतं. आता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतही तिने गोल्ड मेडल जिंकत डबल पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होण्याचा मान पटकावला आहे. अवनीने महिलांच्या १० मीटर एयर रायफल (SH1) प्रकारात गोल्ड मेडल जिंकलं. यापूर्व टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही गोल्ड मेडलला गवसणी घातली होती.

सर्जरीनंतर पॅरालिम्पिकसाठी पॅरिसला रवाना

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पाच महिन्यांपूर्वी अवनीची सर्जरी करण्यात आली होती. २२ वर्षीय अवनीच्या गॉलब्लॅडरमधून पतरी काढण्यासाठी ऑपरेशन करावं लागलं होतं. त्यावेळी इतक्या वेदना झाल्या होत्या की, तिने सराव करणं बंद केलं होतं.

त्यामुळेच तिने मार्चमध्ये सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता. या ऑपरेशननंतर तिने कमबॅक केलं आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं. तिचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता.

अवनी लेखराचे वडील प्रवीण कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ' अवनीला २०२३ मध्ये गॉलब्लेडरच्या पतरीचा त्रास होत होता. याचा तिच्या सरावावर परिणाम होत होता.

तिच्या कंबरेच्या आणि पोटाजवळ वेदना होत होत्या,त्यामुळे शूटींग करताना तिला त्रास व्हायचा. तिला पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करायची होती. त्यामुळे आम्ही गॉलब्लेडर काढण्याचा निर्णय घेतला होता. तिला ठिक होण्यासाठी बराच वेळ लागला. '

वयाच्या ११ व्या वर्षी झाला होता अपघात

वयाच्या ११ व्या वर्षी एका कार अपघातामुळे ती पूर्णपणे पॅराप्लेजियामुळे ग्रस्त झाली. पॅराप्लेजिया म्हणजे पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे खालच्या अंगांना लकवा मारतो. हे पाठीच्या कण्याला आणि तंत्रिका तंत्राला झालेल्या गंभीर नुकसानाचे परिणाम आहे. ही घटना घडल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला खेळांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केलं. तिने तिरंदाजी केली, त्यानंतर शूटींगही केली. २२ वर्षीय अवनी लेखरा सध्या लॉ करत आहे. शूटींगमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे २०२१ मध्ये तिला खेळरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT