Sports

Who is Akash Deep:आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारा आकाश दीप आहे तरी कोण?

Akash Deep : भारत आणि इंग्लंडच्या संघात कसोटी मालिका होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. उर्वरित तीन कसोटी मालिकेतील इतर सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला. यात बिहारचा क्रिकेटपटू आकाश दीपला संधी मिळालीय.

Bharat Jadhav

Who is Akash Deep:

भारत आणि इंग्लंडच्या संघात कसोटी मालिका होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. उर्वरित तीन कसोटी मालिकेतील इतर सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला. यात बिहारचा क्रिकेटपटू आकाश दीपला संधी मिळालीय. आकाश दीपला आवेश खानच्या जागेवर संघात घेण्यात आले आहे. संघात पदार्पण करणारा आकाश कोण आहे, याचा शोध इंटरनेटवर घेतला जात आहे. (Latest News)

बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील आकाश दीपचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीपचा संघात समावेश करण्यात आलाय. आकाश दीप आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो आणि नुकत्याच झालेल्या इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सामन्यात आकाशने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तो भारतीय संघाचा सदस्य होता. आकाश दीपने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०३ बळी घेतले आहेत. तर टी२० मध्ये त्याने ४८ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजीतील आकाशची कामगिरी पाहूनच निवडकर्त्यांनी त्याचा कसोटी संघात समावेश करू घेतलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळवणं बिहारच्या आकाश दीपसाठी सोपं नव्हतं. या संघात पोहोचण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संघात संधी मिळण्याआधी आकाश टेनिस बॉलवरील टूर्नामेंटमध्ये खेळायचा.

आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात देशार्गत क्रिकेटची सुरूवात बंगालमधून केली. दीपने ९ मार्च २०१९ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून टी२० मध्ये पदार्पण केलं. तर २४ सप्टेंबर २०१९ ला विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून लिस्ट अ ची सुरूवात केली आहे. २५ सप्टेंबर २०१९ ला रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून प्रथम श्रेणीच्या क्रिकेट खेळत रणजीत पदार्पण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT