Sourav Ganguly : सौरव गांगुलीच्या घरात चोरी; चोरांनी मोबाईल पळवला, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरात चोरी झालीय. दादाचा मोबाईल चोरीला गेलाय. मोबाईल मध्ये महत्त्वाची माहिती असल्याने सौरभ गांगुलीला टेन्शन आले आहे. कोलकात्याच्या ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
Sourav Ganguly
Sourav Ganguly Yandex

Sourav Ganguly Mobile Phone Lost:

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरातून मोबाईल चोरीला गेलाय. बेहाला येथील त्याच्या घरात चोरीच घटना घडलीय. सौरव गांगुलीने कोलकात्याच्या ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. सौरभ गांगुलीने पोलीस अधिकाऱ्याच्या नावे पत्र लिहून मोबाईचा शोधण्याची विनंती केलीय. (Latest News)

घरात खूप शोधाशोध करूनही फोन सापडला नाही, मोबाईलमध्ये महत्वाची वैयक्तिक माहिती असल्याने आपण चिंतेत असल्याचं त्याने आपल्या पत्रात म्हटलंय. मोबाईल फोनमधील वैयक्तिक माहिती उघड होऊ नयेत यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती सौरभ गांगुलीने आपल्या पत्रात केलीय. सौरव गांगुली शहारबाहेर गेला होता. बाहेर गावावरून शनिवारी घरी परतल्यानंतर तो फोन शोधू लागला. फोन घरातच ठेवल्याचं त्याला वाटलं होतं. त्यामुळे त्याने आधी घरात शोधा-शोध केली, परंतु फोन घरात मिळाला नसल्याने त्याने पोलीस चोरीची तक्रार दाखल केलीय.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com