IPL 2026 auction date and venue saam tv
Sports

IPL 2026 चा लिलाव कधी होणार? 77 खेळाडूंवर बरसणार 237 कोटींचा पाऊस; जाणून घ्या लिलावाचे डिटेल्स

IPL 2026 auction date and venue: आयपीएल 2026 च्या तयारीला जोर मिळत असताना सर्व फ्रँचायझींनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली असून या सूचीमध्ये अनेक मोठ्या परदेशी नावांचा समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच आयपीएल २०२६ साठी सर्व टीम्सने त्यांनी रिलीज केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर केली. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. यावेळी रचिन रवींद्र, आंद्रे रसल, डेव्हन कॉन्वे, डेविड मिलर, जॉश इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टोन आणि वणिंदू हसरंगा यांसारखे मोठे परदेशी खेळाडू यंदा आयपीएल लिलावात दिसणार आहेत. मात्र या वेळी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंसाठी फक्त 27 जागा रिक्त आहेत. तर एकूण रिकाम्या स्लॉट्सची संख्या 77 आहे.

यंदाचा आयपीएल लिलाव एकाच दिवशी होऊ शकतो. कारण हे मिनी ऑक्शन असणार आहे. आयपीएलमध्ये एकूण 10 टीम्स खेळतात आणि प्रत्येक टीम आपल्या स्क्वाडमध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवू शकतो. आता लिलाव आणि टीमशी संबंधित नियम काय आहेत ते पाहूयात.

एका IPL संघात किती खेळाडू असू शकतात?

एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा समावेश करता येतो.

एका IPL संघात जास्तीत जास्त किती परदेशी खेळाडू असू शकतात?

एका संघात जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू ठेवता येतात.

IPL 2026 ऑक्शनमध्ये एकूण किती स्लॉट्ससाठी बोली लागणार आहे?

लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी काही दिवसांत शॉर्टलिस्ट केली जाणार आहे. एकूण 77 खेळाडूंची विक्री होणार आहे. कारण सर्व 10 टीम्समध्ये मिळून इतक्या जागा रिकाम्या आहेत. सर्वाधिक रिकाम्या जागा कोलकाता नाईट रायडर्सकडे आहेत, ते 13 खेळाडू घेऊ शकतात. सर्वात कमी जागा पंजाब किंग्सकडे आहेत, ज्यांनी 21 खेळाडू रिटेन केले आहेत.

IPL 2026 लिलावात परदेशी खेळाडूंसाठी किती स्लॉट्स रिकामे आहेत?

सर्व टीम्समध्ये मिळून परदेशी खेळाडूंसाठी एकूण 27 जागा रिकाम्या आहेत.

सर्व टीम्सचे एकूण आणि परदेशी खेळाडूंसाठी रिकामे स्लॉट्स

  • चेन्नई सुपर किंग्स: 9 (4 परदेशी)

  • मुंबई इंडियन्स: 5 (1 परदेशी)

  • कोलकाता नाईट रायडर्स: 13 (6 परदेशी)

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: 8 (2 परदेशी)

  • सनरायझर्स हैदराबाद: 10 (2 परदेशी)

  • गुजरात टायटन्स: 5 (परदेशी)

  • राजस्थान रॉयल्स: 9 (1 परदेशी)

  • लखनऊ सुपर जायंट्स: 6 (4 परदेशी)

  • दिल्ली कॅपिटल्स: 8 (5 परदेशी)

  • पंजाब किंग्स: 4 (2 परदेशी)

सर्व टीस्मचा पर्स बॅलन्स

  • KKR – 64.3 कोटी रुपये

  • CSK – 43.4 कोटी रुपये

  • SRH – 25.5 कोटी रुपये

  • LSG – 22.95 कोटी रुपये

  • DC – 21.8 कोटी रुपये

  • RCB – 16.4 कोटी रुपये

  • RR – 16.05 कोटी रुपये

  • GT – 12.9 कोटी रुपये

  • PBKS – 11.5 कोटी रुपये

  • MI – 2.75 कोटी रुपये

सर्व टीम्सचा पर्स बॅलन्स मिळून 237 कोटी रुपये आहे. सर्वाधिक पर्स कोलकाता नाईट रायडर्सकडे आहे, तर सर्वात कमी मुंबई इंडियन्सकडे आहे.

IPL 2026 लिलाव कधी होणार?

आयपीएल 2026 ऑक्शनची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही, पण समोर आलेल्या माहितीनुसार तो 15 डिसेंबरला होऊ शकतो.

IPL 2026 लिलाव कुठे होणार?

ऑक्शनचं ठिकाण भारत असण्याची प्राथमिकता आहे. मात्र, परदेशात घेण्याचाही विचार सुरू आहे. जर भारताबाहेर झाला, तर तो यूएईमध्ये होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुलेखन क्षेत्रात भारताचा डंका! अक्षया ठोंबरे यांना मिळाला जागतिक स्तरावरील सर्वोच्च सन्मान

Death Signs: मृत्यूच्या २४ तासाआधी दिसणारी तीन प्रमूख लक्षणे जाणून व्हाल थक्क; तज्ज्ञांनी दिली माहिती

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Priyanka Chopra: देस गर्ल प्रियांकाचा आइवरी लेहेंग्यातील लूक व्हायरल, पाहा PHOTO

IND vs SA : मायदेशात धूळधाण, फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; आफ्रिकेचा 30 रन्सने विजय

SCROLL FOR NEXT