cricket twitter
क्रीडा

Red Card In Cricket: क्रिकेटमध्ये पहिल्यांदा रेड कार्ड कोणाला दिलं गेलं? काय होतं कारण?

Red Card Rule In Cricket: फुटबॉलमध्ये रेड कार्डचा वापर केला जातो. मात्र क्रिकेटमध्ये रेड कार्ड दिलं गेल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?

Ankush Dhavre

तुम्ही फुटबॉलप्रेमी असाल, तर एक गोष्ट तुम्ही नक्कीच पाहिली असेल. कुठल्याही खेळाडूने गैरवर्तन केलं, की रेफ्री सरळ रेड कार्ड दाखवतो. रेड कार्ड दाखवल्यानंतर त्या खेळाडूला मैदान सोडून बाहेर जावं लागतं.

फुटबॉलमध्ये हे कॉमन आहे. मात्र क्रिकेटमध्ये कधी कुठल्या खेळाडूला रेड कार्ड मिळाल्याचं आणि मैदान सोडून बाहेर जावं लागल्याचं तुम्ही ऐकलंय का? क्वचितच ऐकलं असेल. मात्र हे घडलंय, कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत.

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सामन्यात सेंट किट्स अँड नेविस पेट्रियट्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यादरम्यान अंपायरने रेड कार्ड दाखवलं. त्यामुळे आंद्रे फ्लेचरला शेवटच्या षटकात १० खेळाडूंसह फिल्डिंग करावी लागली.

CPL मध्ये खेळाडूला दाखवलं रेड कार्ड

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत हा नियम लागू करण्यात आला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने निर्धारीत वेळेत षटकं पूर्ण करावीत म्हणून हा नियम लागू करण्यात आला आहे. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने निर्धारीत वेळेत आपली षटकं पूर्ण केली नाहीत, तर संघातील एका खेळाडूला मैदानाबाहेर केलं जाऊ शकतं.

क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच रेड कार्ड दिलं गेलंय का?

फुटबॉलमध्ये रेड कार्ड दिलं जाणं ही सामान्य बाब असली तरीदेखील क्रिकेटमध्ये हे सहसा पाहायला मिळत नाही. क्रिकेटमध्ये रेड कार्ड दिलं जाण्याची ही पहिलीच बाब आहे का? तर उत्तर आहे, नाही.

क्रिकेटमध्ये यापूर्वीही अनेकदा रेड कार्ड दिलं गेलं आहे. मात्र त्याची कारणं नेहमीची वेगळी राहिली आहेत. फुटबॉलमध्ये एखाद्या खेळाडूने धक्काबुक्की केली किंवा गैरवर्तन केलं, तर रेड कार्ड दिलं जातं . मात्र क्रिकेटमध्ये वेगळ्या कारणासाठी रेड कार्ड देण्यात आलं आहे.

क्रिकेटमध्ये रेड कार्ड दाखवण्याची घटना २००५ मध्ये घडली होती. त्यावेळी अंपायर बिली बॉडेन होते. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टी-२० सामना सुरु होता. त्यावेळी ग्लेन मॅकग्राला अंडरआर्म चेंडू टाकण्यामुळे रेड कार्ड दाखवण्यात आलं होतं. हा चेंडू टाकण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटींगने अंपायरसोबत दिर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर ग्लेन मॅकग्राने अंडरआर्म चेंडू टाकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT