Johnson Charles Viral Video
Johnson Charles Viral Videotwitter

CPL 2023: अंदाज चुकला, फटका फसला; गंभीर दुखापतीतून विंडीजचा फलंदाज थोडक्यात बचावला ; पाहा थरारक VIDEO

Johnson Charles Viral Video: फलंदाजी करताना त्याने आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला.
Published on

CPL Viral Cricket Video:

सध्या वेस्टइंडीजमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात जॉन्सन चार्ल्स दुखापत होण्यावाचून थोडक्यात बचावला आहे. जॉन्सन चार्ल्स कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेत सेंट लुसिया संघाचे प्रतिनिधीत्व करतोय.

या संघाकडून फलंदाजी करताना त्याने आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Johnson Charles Viral Video
Asia Cup 2023: 'केएल राहुलला बाहेर करा.. ', माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ..

ही घटना १२ व्या षटकात घडणार होती. तर झाले असे की सेंट लुसिया किंग्स संघाची फलंदाजी सुरू असताना १२ वे षटक टाकण्यासाठी ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

त्यावेळी षटकातील चौथ्या चेंडूवर जॉन्सन चार्ल्सने फुलटॉस चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने स्कुप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉट खेळल्यानंतर चेंडू मागे न जाता बॅटचा कडा घेत तोंडाजवळ आला.

हा चेंडू बॅटला लागताच हेल्मेटला जाऊन लागला. चेंडू आपल्याकडे येतोय हे पाहून जॉन्सन चार्ल्सने स्वत: ला सावरलं. चेंडू हेल्मेटला लागताच हेल्मेट स्टम्पवर पडणार होत, इतक्यात जॉन्सन चार्ल्सने पायाने हेल्मेटला स्टम्पपासून दुर फेकलं.

यात समाधानकारक बाब म्हणजे जॉन्सन चार्ल्स गंभीर दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावला. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सेंट लुसिया किंग्स आणि ट्रिनबॅगो नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये स्पर्धेतील ९ वा सामना पार पडला. या सामन्यात सेंट लुसिया किंग्स प्रथम फलंदाजी करताना १६८ धावांचे आव्हान दिले होते.

या डावात जॉन्सन चार्ल्सने ३१ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने ५७ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला अवघ्या ११३ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com