WPL Auction 2023:
WPL Auction 2023: Saam Tv
क्रीडा | IPL

WPL Auction 2023: फ्रीमध्ये पाहता येणार Women's Premier League २०२३ स्पर्धेचे ऑक्शन; पाहा ऑक्शनबद्दल सर्व काही

Saam TV News

Women's Premier League: वुमेन्स प्रीमियर लीग (Women's Premier League Auction) स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी होणारे ऑक्शन आज मुंबईत पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात ४ मार्च पासून होणार असून २६ मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.

हे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडणार आहेत. या ऑक्शनसाठी जगभरातील एकूण १५२५ महिला क्रिकेटपटूंनी नाव नोंदणी केली होती.

त्यापैकी ४०९ खेळाडूंची ऑक्शनसाठी निवड केली गेली आहे. या ४०९ खेळाडूंपैकी ९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या ऑक्शनमध्ये ५ फ्रेंचायझी कमीत कमी १५ आणि जास्तीत जास्त १८ खेळाडूंना आपल्या संघात स्थान देऊ शकतात. (Latest Sports Updates)

जाणून घ्या वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेच्या ऑक्शन बद्दल सर्व काही

केव्हा आहे वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन?

वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन आज (१३ फेब्रुवारी) पार पडणार आहे.

कुठे पार पडणार वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन ?

वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन मुंबईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे.

किती वाजता सुरु होणार वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन?

वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होणार आहे.

कुठे पाहू शकता लाईव्ह?

वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे थेट प्रसारण करण्याचे हक्क वायाकॉम १८ कडे आहेत. तुम्ही हे ऑक्शन स्पोर्ट्स १८ नेटवर्क, स्पोर्ट्स १८ १एसडी आणि स्पोर्ट्स १८ १एचडीवर लाईव्ह पाहू शकता.

फोन आणि लॅपटॉपवर कुठे पाहू शकता लाईव्ह?

वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन जर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील लाईव्ह पाहू शकता. हे ऑक्शन जिओ सिनेमावर लाईव्ह दाखवले जाणार आहे.

इथे पाहू शकता फ्री लाईव्ह स्ट्रीम..

वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे ऑक्शन तुम्ही जिओ सिनेमा या ऍपवर फ्रीमध्ये देखील पाहू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्डकपआधी पाकिस्तान संघात मोठा बदल! टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाचा संघात समावेश

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक

Most Expensive Mango: जगातील सर्वात महाग आंबा कोणता?

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ कसा टिकणार? वाचा टिप्स

Net Saree Tips: नेटची साडी धुताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

SCROLL FOR NEXT