T20 World Cup 2024: वर्ल्डकपआधी पाकिस्तान संघात मोठा बदल! टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाचा संघात समावेश

Pakistan Head Coach: येत्या १ जूनपासून टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेेसाठी पाकिस्तान संघाने आपल्या संघात मोठा बदल केला आहे.
pakistan cricket team named gary kirsten and jason gillspie as their head coach amd2000
pakistan cricket team named gary kirsten and jason gillspie as their head coach amd2000twitter

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (वनडे आणि टी-२०) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. तर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जेसन गिलेस्पीची कसोटी संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या १ जूनपासून टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघाने हा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मिकी आर्थर हे तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाचे हेड कोच होते.

pakistan cricket team named gary kirsten and jason gillspie as their head coach amd2000
MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

त्यांनी हे पद सोडल्यानंतर पाकिस्तानला तिन्ही फॉरमॅटमध्ये मुख्य प्रशिक्षकाची गरज होती. मिकी आर्थरनंतर मोहम्मद हफीजने टीम डायरेक्टरची जबाबदारी स्विकारली होती. मात्र त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सुमार कामगिरी केली होती. त्याची ही कामगिरी पाहता त्याला पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं.

pakistan cricket team named gary kirsten and jason gillspie as their head coach amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

गॅरी कर्स्टनच्या मार्गदर्शनाखाली कोरलं वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव...

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०११ वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तब्बल २८ वर्षांची प्रतिक्षा संपवत भारतीय संघाने वर्ल्डकपची ट्ऱॉफी जिंकली होती. यासह कसोटी रँकिंगमध्येही भारतीय संघाने अव्वल स्थान गाठलं होतं. सध्या ते गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाची भूमिका बजावत आहेत.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी होणार आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहास पाहिला, तर भारतीय संघाला पाकिस्तानकडून केवळ एकाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com