babar azam named as captain of pakistan cricket team ahead of t20 world cup 2024 amd2000
babar azam named as captain of pakistan cricket team ahead of t20 world cup 2024 amd2000twitter

Pakistan Captain: पाकिस्तानचा कर्णधार बदलला! टी-२० वर्ल्डकपआधी घेतला मोठा निर्णय

Babar Azam News In Marathi: येत्या जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला आहे.

Babar Azam Captaincy News:

वनडे वर्ल्डकप २०२४ स्पर्धेदरम्यान पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला होता. संघातील अनुभवी फलंदाज बाबर आझमने कर्णधारपदावरुन माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा तोंडावर असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार पुन्हा एकदा बदलला आहे. या संघाची जबाबदारी पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवण्यात आली आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरु असताना बाबर आझमने कर्णधारपदाला रामराम केला होता. ही त्याने स्वत:हून जाहिर केलं होतं. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याने फलंदाज म्हणून संघासाठी योगदान दिलं. येत्या जून महिन्यात पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

babar azam named as captain of pakistan cricket team ahead of t20 world cup 2024 amd2000
CSK vs DC, IPL 2024: गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

ही महत्वाची स्पर्धा पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघात नेतृत्व करण्यासाठी बाबर आझमइतका अनुभव दुसऱ्या कुठल्याच खेळाडूकडे नाही. त्यामुळे ही मोठी जबाबदारी बाबर आझमकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cricket news in marathi)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळताना फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका केली गेली होती. त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी शाहिन आफ्रिदीवर सोपवण्यात आली. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना देखील पाकिस्तान संघाची कामगिरी खालावली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पाकिस्तानला १-४ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

babar azam named as captain of pakistan cricket team ahead of t20 world cup 2024 amd2000
Mayank Yadav Fastest Ball: वेगाचा नवा बादशहा! मयांकने पदार्पणातच टाकला 155.8 kmph गतीचा चेंडू- VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com