Babar Azam Viral Video: बॅटिंग करायला आलोय हेच विसरला बाबर आझम; नॉन स्ट्राईकला असताना केलं असं काही; पाहा मजेशीर Video

Australia vs Pakistan Test Series: वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia vs Pakistan) गेला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
babar-azam
babar-azamtwitter
Published On

Babar Azam Funny Video:

वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia vs Pakistan) गेला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ सराव सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

पाकिस्तान ११ आणि प्राईम मिनिस्टर ११ या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम, आपण फलंदाजी करतोय हे विसरल्याचं दिसून आलं आहे. या सामन्यातील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Babar Azam Viral Video)

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा सराव सामना सुरु आहे. त्यावेळी पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना पाकिस्तानचा नवा कर्णधार शान मसुदने स्ट्रेट ड्राईव्ह मारला.

हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने जात होता. त्यावेळी नॉन स्ट्राईकला फलंदाजी करत असलेला बाबर आझम विसरला की, तो फलंदाजी करतोय. बाबर हा चेंडू अडवताना दिसून आला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सराव सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८० षटकअखेर २८७ धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून अब्दुला शफिकने ३७ धावा केल्या. तर इमाम उल हक अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शान मसूद आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मात्र बाबर आझम मोठी खेळी करु शकला नाही. तो अवघ्या ४० धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

babar-azam
IND vs PAK Match: वर्ल्डकपनंतर IND-PAK पुन्हा येणार आमने-सामने; तारीख अन् ठिकाण ठरलं

असं आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला कसोटी सामना - १४ ते १८ डिसेंबर,२०२३

दुसरा कसोटी सामना - २६ ते ३० डिसेंबर,२०२३

तिसरा कसोटी सामना- ३ ते ७ जानेवारी,२०२४

babar-azam
Birthday Special: बर्थडे आहे भावांचा! टीम इंडियाला आजच्याच दिवशी मिळाले हे ५ सुपरस्टार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com