INDW VS PAKW: जिंकलो रे! जेमिमाच्या रुद्रावतारासमोर पाक गोलंदाज सरेंडर; भारताचा दिमाखदार विजय

INDW VS PAKW
INDW VS PAKWSaam tv
Published On

INDW VS PAKW :नुकताच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारत विरुद्व पाकिस्तान (India vs Pakistan)या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी १५० धावांचे आव्हान दिले गेले होते. हे आव्हान भारतीय संघ पूर्ण करत जोरदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्माने ३३ धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर रिचा घोषने ३१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. (Latest Sports Updates)

INDW VS PAKW
IND VS AUS:टीम इंडियाची चिंता वाढणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री

पाकिस्तान संघाने दिले १५० धावांचे आव्हान..

पाकिस्तान संघाकडून फलंदाजी करताना जावेरिया खान ८ तर मुनीबा अली १२ धावा करत माघारी परतली. त्यानंतर कर्णधार बिस्मा मारूफने जबाबदारी स्वीकारत फलंदाजी केली. तिने या डावात नाबाद ६८ धावा केल्या.

तर आयशा नसीमने ४३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ४ गडी बाद १४९ धावा केल्या.

तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, राधा यादवने २१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

INDW VS PAKW
INDW VS PAKW : पाकिस्तान संघाची तेज तर्रार सुरुवात, भारताला विजयासाठी १५० धावांचे आव्हान

अशी होती दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष(विकेटकिपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग

पाकिस्तान – जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकिपर), बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com