भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. भारतीय संघातील खेळाडू देखील चेन्नईच्या मैदानावर घाम गाळताना दिसून आले आहेत.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडीयमवर रंगणार आहे. भारतीय संघ ही मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानला पराभूत करुन आलेला बांगलादेशचा संघ भारतीय संघालाही धुळ चारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना केव्हा होणार आहे?
हा सामनात १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत खेळला जाणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे खेळला जाणार आहे?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडीयमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना किती वाजता सुरु होईल?
हा सामना १९ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर लाईव्ह पाहता येऊ शकतो.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना तुम्ही जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही www.saamtv.esakal.com वर मिळवू शकता.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
बांगलादेश:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.