Rohit Sharma Twitter
क्रीडा

IND vs AFG, Super 8: सुपर 8 फेरीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान? रोहितने केला खुलासा

Ankush Dhavre

भारतीय संघाने साखळी फेरीत शानदार कामगिरी करत टी-२० वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. भारतीय संघाचा पुढील सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघाच्या तयारीबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्माने बीसीसीआयच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'आमचे खेळाडू जोशमध्ये आहेत. आम्हाला स्पर्धेतील दुसऱ्या टप्पाला जोरदार सुरुवात करायची आहे. त्यामुळे आमचं १०० टक्के देऊन प्रचंड मेहनत घेत आहोत. आम्ही आमच्या स्किल्स आणखी चांगल्या कशा होतील यावर भर देत आहोत.'

तसेच तो पुढे म्हणाला की,' ज्या प्रकारचं वेळापत्रक आहे, त्याचा थोडाफार त्रास होऊ शकतो. मात्र आम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे आम्ही कारणं देऊ शकत नाही. आम्ही आमच्या स्किल्सवर मेहनत घेतोय. त्यामुळे प्रत्येक सराव सत्र आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. या मैदानावर आम्ही अनेक सामने खेळलो आहे, त्यामुळे आम्हाला परिस्थितीचा चांगलाच अंदाज आहे.'

'निकाल आमच्याच बाजूने लागावा यासाठी आम्ही पूर्ण जोर लावू. सर्वांचं लक्ष पुढील सामन्यांवर असणार आहे.' असं रोहित शर्मा म्हणाला. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी भारतीय संघाचा सामना बागंलादेशविरुद्ध होणार आहे. तर शेवटचा सामना २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT