भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ८ मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यात तो असा रेकॉर्ड करु शकतो जो आजवर कुठल्याच फलंदाजाला करता आलेला नाही.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्माची बॅट शांत आहे. यापूर्वी झालेले सामने न्यूयॉर्कमध्ये पार पडले. या खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता. मात्र यापुढील सामने वेस्टइंडिजमध्ये होणार आहेत. या खेळपट्टीवर मोठे स्कोअर पाहायला मिळू शकतात. रोहित शर्मा देखील चौकार षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड करण्यासाठी रोहितला अवघ्या ६ षटकारांची गरज आहे. ६ षटकार मारताच तो टी-२० क्रिकेटमध्ये २०० षटकार पूर्ण करणार आहे.
असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरु शकतो. भारतीय संघाला सुपर ८ मध्ये ३ सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल म्हणजे सर्व काही ठरल्यानुसार झालं, तर भारतीय संघाला ५ सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे ५ सामन्यांमध्ये रोहित ६ षटकार खेचून टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचू शकतो.
रोहित शर्मा असा कारनामा करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरणार आहे. जगातील कुठलाच फलंदाज टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार मारु शकलेला नाही. सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा रोहितच्याच नावावर आहे. त्याने आतापर्यंत १९४ षटकार मारले आहेत. तर न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज मार्टीन गप्टील १७३ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.
रोहित शर्मा (भारत) - १९४ षटकार
मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) - १७३ षटकार
जोस बटलर (इंग्लंड) - १३० षटकार
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - १२९ षटकार
पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) - १२८ षटकार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.