सध्या आयपीएलमध्ये एक नाव गाजतंय ते म्हणज दिग्वेश राठी. मुळात विकेट घेतल्यानंतर प्रत्येकल गोलंदाजाच्या सेलिब्रेशनची एक स्टाईल असते. मात्र दिग्वेशच्या प्रकरणात त्याला हे सेलीब्रेशन करणं महागात पडलंय. याचं कारण म्हणजे विकेट घेतल्यानंतर सेलीब्रेशन केल्याने त्याला थेट दंड ठोठावण्यात आला.
तुम्ही दिग्वेशचं विकेट घेतल्यानंतरचं सेलीब्रेशन पाहिलंय का? त्याच्या या सेलिब्रेशनला खास नोटबूक सेलिब्रेशन म्हटलं जातं. या सेलिब्रेशनमध्ये तो विकेट घेतल्यानंतर आपल्या हातावर वही समजून काहीतरी लिहिण्याची एक्टिंग करतो. मात्र दंड लावल्यापासून त्याने यामध्ये बदल केला असून तो आता जमिनीवर लिहायची एक्टिंग करतो.
स्पोर्ट्स तकला दिलेल्या माहितीत दिग्वेशने सांगितलंय की, तो अशा पद्धतीचं सेलिब्रेशन का करतो? पंजाबविरूद्धच्या सामन्यात त्याने प्रियांश आर्यला आऊट केल्यानंतर नोटबुक सेलीब्रेशन केलं होतं. ज्यामुळे त्याला दंड लगावण्यात आला.
मात्र दिग्वेश या नोटबुकमध्ये नेमकं काय लिहीतो हे विचारल्यावर तो म्हणाला, प्रियांश माझा सर्वात चांगला मित्र आहे. आम्ही एकमेकांशी बोललो होतो. तेव्हाच आमचं ठरलं होतं. तो म्हणाला की, मी जास्त रन्स केले तर मी अशा पद्धतीचं सेलिब्रेशन करेन किंवा मी तुला आऊट केलं तर मी हे सेलिब्रेशन करेन.
दिग्वेश पुढे म्हणाला की, त्या सेलिब्रेशनच्या वेळी मी काहीही लिहिलं नाही. नोटबुक समजून मी त्याचं नाव नोटबुकमध्ये लिहिलं होतं. बीसीसीआयचे काही नियम असतात आणि आपण त्याच्या विरूद्ध जाऊ शकत नाही. त्यामुळे मी आता जमिनीवर फलंदाजाचं नाव लिहितो आणि त्यामध्ये एक गुपित आहे. मला याला गुपितंच ठेवायचं आहे.
मी पहिल्यांदा फलंदाजी करतो होतो. मात्र फलंदाजी करताना मी थकून जायचो. मग मी गोलंदाजी करायला लागलो. कमेंट्रीमध्ये नाव ऐकल्यानंतर मला सुनील नसरीनबाबत उत्सुकता लागली. मी त्याची गोलंदाजी पाहण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो एक नकल बॉल टाकायचा. मी पहिल्यांदा तसा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला तर फलंदाज तो खेळू शकला नाही. मी मस्करीत त्याला घेतलं आणि आता ते माझं प्रोफेशनल बनलंय, असंही दिग्वेशने सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.