भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला. हा सामना फार रोमांचक लढतीत पोहोचला होता. अखेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारून सामना जिंकला. दरम्यान या सामन्याच्या थरारासोबतच फॅन्स रोहित शर्माच्या मजेशीर क्षणांचा आनंद घेत होते.
सध्या रोहित आणि विराट हे दोघं फक्त एकाच फॉर्मेटमध्ये एकत्र दिसतात. कालचा सामना सुरु असताना रोहित शर्माचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितसोबत ऋषभ पंतही दिसला. यावेळी पंतने रोहितला एक टोटका करण्यास भाग पाडलं.
दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत यांच्यात एक मजेदार क्षण पाहायला मिळाला. ही घटना त्या वेळी घडली ज्यावेळी प्लेईंग ११ मध्ये नसलेल्या पंतशी रोहित शर्मा बाऊंड्री लाईनवर बोलत होता.
पंतने रोहितच्या पापणीचा केस त्याच्या चेहऱ्यावर पाहिला. त्याने तो उचलून रोहितच्या हातावर ठेवला आणि त्याला इच्छा मागण्यास सांगितलं. ही एक सर्वसामान्य मान्यता आहे की, असा इच्छा मागितल्यास ती पूर्ण होते. यावेळी रोहित शर्मा हसला आणि त्याने डोळे मिटून आपली इच्छा मागितली. दरम्यान रोहितचा जवळचा मित्र अभिषेक नायरने या टोटक्याद्वारे कोणती इच्छा मागितली असेल याबाबत खुलासा केला आहे.
रोहितने काय इच्छा मागितली असेल याचा खुलासा अभिषेक नायरने केला आहे. त्याने सांगितलं की, रोहितने कदाचित पुढच्या सामन्यात शतकाची किंवा 2027 वर्ल्ड कप ट्रॉफीची इच्छा मागितली असेल.
रोहित शर्माच्या अजून वनडे वर्ल्डकप जिंकलेला नाही. 2023 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्रॉफीपासून एक पाऊल दूर राहिली. हिटमॅनचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे आणि तो 2027 वर्ल्ड कपचं लक्ष्य समोर ठेऊन चालला आहे. ज्यावेळी रोहितने इच्छा मागितली तेव्हा अभिषेक नायरने कमेंट्री बॉक्समध्ये सांगितलं की, ही इच्छा शतकासाठी किंवा वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी असू शकते.
रोहित शर्माने रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार अर्धशतक ठोकलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. जयपूरला झालेल्या सामन्यात रोहित अवघ्या 14 रन्सवर बादल झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये हिटमॅनने शतक झळकावले होतं. त्यानंतर आता चाहते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितच्या शतकाची प्रतीक्षा करतायत.
रोहित-पंतचा क्यूट व्हिडिओप्रमाणे विराट कोहलीचा एक मजेदार व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विराट कोहलीने क्रीजवर त्याच्या हटके स्टाईलने डान्स केला. फॅन्सना कोहलीचा हा मजेदार डान्स खूप आवडलाय. कोहलीच्या शतकाच्या जोरावरच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल 358 रन्सचा डोंगर उभारला होता. याशिवाय ऋतुराज गायकवाडनेही या सामन्यात शतकी खेळी केली. मात्र दोघांचीही शतकी खेळी व्यर्थ गेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.