dwayne smith  twitter
क्रीडा

LLC 2023 Qualifier: अवघ्या २१ चेंडूत ठोकल्या ९८ धावा! ४० वर्षीय फलंदाजाचा कहर

Legends League Cricket: लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील नॉकआऊट फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे.

Ankush Dhavre

Dwayne Smith Century: 

लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील नॉकआऊट फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. मणिपाल टायगर्स आणि अर्बनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये या स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना पार पडला.

सुरतच्या लालाभाई कॉन्ट्रेक्टर स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद संघाने मणिपाल संघावर ७५ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात ४० वर्षीय फलंदाजाने ४२ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे.

वेस्टइंडिजचा माजी आक्रमक फलंदाज ड्वेन स्मिथ या स्पर्धेत अर्बनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान मंगळवारी त्याने या संघाकडून खेळताना विस्फोटक खेळी केली आहे. त्याने तुफानी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

स्मिथने या डावात ५३ चेंडूंचा सामना करत १२० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ७ षटकार मारले. म्हणजेच केवळ चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने त्याने अवघ्या २१ चेंडूत ९८ धावा चोपल्या. त्याच्या या विस्फोटक खेळीच्या बळावर अर्बनरायझर्स हैदराबादने २० षटक अखेर २५३ धावांचा डोंगर उभारला होता.

सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्बनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मणिपाल टायगर्स संघाला धावांचा पाठलाग करताना केवळ १७८ धावा करता आल्या.

या डावात अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर अर्बनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना पीटर ट्रेगो आणि आणि जेरोम टेलरने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. या सामन्यात तुफानी शतकी खेळी करणाऱ्या स्मिथची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. (Latest sports updates)

अर्बनरायझर्स हैदराबादन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर एलिमिनेटरच्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. जो संघ हा सामना गमावणार तो संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर विजेता संघ क्विलाफायर १ मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत खेळताना दिसेल. हा सामना ७ डिसेंबर रोजी होईल. तर स्पर्धेतील अंतिम सामना ९ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT